Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ परभणी शहरातील वाटीका जलकुंभावरील पाणीपुरवठा राहणार १२ दिवस बंद




परभणी ➡️  शहरातील वसमतरोडवरील वाटीका हॉटेल जवळील जलकुंभावरील पाणीपुरवठा १२ दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याची माहीती महानगर पालीकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिली आहे. (vnsnews-24, gov, parbhani ) 




परभणी शहरातील वसमत रस्त्यावरील वसाहतींना राहटी येथील बंधाऱ्यातून पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी नदीलगत उपसा विहीर आहे. या विहीरीत मोठ्याप्रमाणत गाळ साचल्याामुळे नदी पात्रातील पाणी साठवण क्षमता कमी होत आहे. त्यामुळे परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीने राहटी नदी पात्रातील विहीरीतील गाळ काढण्याचे काम हाती घेतले आहे. 




सदरील काम करणेसाठी वसमत रोड वरील वाटीका हॉटेलच्या मागील जलकुंभावरून करण्यात येणारा पाणी पुरवठा दिनांक १८/०३/२०२३ ते २९/०३/२०२३ पर्यंत या भागातील वसमतरोड येथील विश्वजिवन सोसायटी, क्रांती नगर, मातोश्री नगर, श्रीहरी नगर, एम.आय.डी.सी परिसर, सिध्दिविनायक नगर, खानापुर गावठान, आदी भगातील पाणीपुरवठा १२ दिवस बंद राहणार आहे. तरी याची नोंद नागरीकांनी घ्यावी असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.







Post a Comment

0 Comments