Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/  जिंतूर पोलिसांनी ऑटोतून जप्त केला दोन लाखांचा अवैध गुटखा;दोन आरोपीं अटक




जिंतूर ➡️ महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला आणि मानवी आरोग्यास अपायकारक असलेला १ लाख ६० हजार ६०० रुपये किमतीचा गुटखा जिंतूर पोलिसांनी जप्त केला असून दोन आरोपींविरुद्ध जिंतूर पोलीस ठाण्यात १६ मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (vnsnews-24, crime, parbhani ) 

 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिंतूर शहरातील साई मंदिर परिसर रहिवासी संतोष अशोक महाजन तथा मूळचा आंगलगाव रहिवासी व पोस्ट ऑफिस परिसर निवासी बालाजी संगेकर या दोघांनी मिळून मानवी आरोग्यास हानीकारक गुटख्याची अवैध विक वाहतूक करीत आहेत. या विषयी गुप्त सूचना प्राप्त होताच जिंतूर पोलिसांनी १६ मार्च रोजी दुपारी १.४५ वाजेच्या दरम्यान बलसा मार्ग सटवाई मंदिर परिसरात सापळा लावला. त्याचवेेळी पुलावर एक ऑटो येताना दिसला.




या ऑटोची तपासणी केेल्यानंतर त्यात 'गोवा १०००, आणि 'राज निवास' नावाचा अवैध गुटखा दिसला. तपासणी नंंतर यात एक लाख १२ हजार २०० रुपये किमतीचा 'गोवा १०००' आणि ४८ हजार ४०० रुपयांचा 'राज निवास' नावाचा गुटखाचा समावेश होता. तसेच १५ हजाराचा किंमतीचा ऑटो पकडण्यात आले. 




या कार्रवाईत एकूण एक लाख ७५ हजार ६०० रुपयेचा माल जब्त करुन पोलिस उपनिरीक्षक टोपाजी कोरके यांच्या फिर्यादीवरून आरोपी संतोष महाजन, बालाजी संगेकर यांच्याविरुद्ध भादंविच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






Post a Comment

0 Comments