Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ शिवरायांचे विचार व संस्कार आजच्या युवकांनी आत्मसात करावेत - डॉ.नामदेव दळवी





नांदेड ➡️  छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने यशवंत प्रबोधन व्याख्यानमाला आयोजन येेेेथील यशवंत महाविद्यालयाच्या ग्रंथालय सभागृहामध्ये जयंती दिनाचे औचित्य साधून आयोजित कार्यक्रमात प्रा.डॉ. नामदेव दळवी यांनी वरील उद्गार काढले. (vnsnews-24, feature, nanded ) 




छत्रपती शिवरायांचे कार्य व त्यांच्यावर झालेले संस्कार त्या संस्कारातून महाराजांनी निर्माण केलेली स्वराज्य याचा आदर्श आजच्या युवकांनी घेऊन आपल्या जीवनाची वाटचाल करावी;असे त्यांनी आवाहन केले.छत्रपती शिवरायांवर झालेल्या संस्कारांमुळेच महाराष्ट्र हा पुरोगामी व वैचारिक स्वातंत्र्य बहाल करणारे राज्य ठरला आहे. छत्रपती शिवरायांपासूनच शहीद भगतसिंग यांनी प्रेरणा घेऊन स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये आपले  महत्त्वपूर्ण योगदान दिले होते; याची आठवणही त्यांनी यानिमित्ताने करून दिली. 





छत्रपती शहाजीराजे भोसले व राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या संस्कारामुळे मातेचे स्वप्न पूर्ण करण्याचे अफाट कार्य शिवरायांनी या महाराष्ट्रात केले. त्या पराक्रमाचा सामर्थ्याचा वापर विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात करून उद्यमशीलता ,कल्पकता, स्त्री औदार्य, धर्मनिरपेक्षता , निःपक्षपातीपणा ,सहिष्णुता या गुण वैशिष्ट्यामुळे महाराजांचे  चरित्र आदर्शवत आहे. विश्व पातळीवर छत्रपती शिवाजी महाराजांसारखा महाप्रतापी राजा दुसरा झाला नाही;असेही ते बोलताना म्हणाले.

 




प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रबोधन व्याख्यानमालेच्या सदस्य उपप्राचार्या  डॉ.कविता सोनकांबळे  यांनी केले .  त्यांनी प्रबोधन व्याख्यानमालेच्या आयोजनामाची भूमिका या निमित्ताने व्यक्त केली.  याप्रसंगी कु.अंजली उबाळे या विद्यार्थिनींनी पोवाडा सादर करून उपस्थितांची मने जिंकली. 





अध्यक्षीय समारोप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गणेशचंद्र शिंदे यांनी केला. महाविद्यालयामध्ये आयोजित करण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना दिली . यशवंत महाविद्यालय हे विद्यार्थी केंद्रित महाविद्यालय असल्यामुळे या महाविद्यालयातील विद्यार्थी हा नक्कीच शिवरायांचे संस्कार आपल्या जीवनी अंगिकारेल;असे ते अध्यक्षीय समारोप करताना म्हणाले.





 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रबोधन व्याख्यानमालेचे समन्वयक डॉ.संदीप पाईकराव यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. ज्ञानेश्वर पपुलवाड यांनी केले. यावेळी यशवंत प्रबोधन व्याख्यानमालेचे सदस्य प्रा.जी.एस.दुथडे, डॉ.मिरा फड, डॉ.कैलास वडजे, डॉ. ज्ञानेश्वर पुपलवाड आदीसह कार्यक्रमाला बहुसंख्य विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राध्यापक व कर्मचारी यांची उपस्थिती होती.









Post a Comment

0 Comments