Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/  छ.शिवरायांचे आज्ञापत्र लोक कल्याणाची साक्ष देणारे - विठ्ठल भुसारी





विद्युत भवन येथे मोठया उत्सहात शिवजन्मोत्सवाचे साजरा

नाचून नाही तर पुस्तके वाचून शिवजन्मोत्सव साजरा करण्याचा शिवशंभू वीज प्रतिष्ठानचा मानस 

नांदेड ➡️ छत्रपती शिवाजी महाराज हे जगातील एकमेव राजे आहेत जे साडेतीनशे वर्षानंतरही जनसामान्यांच्या काळजात घर करून आहेत. आपल्या आज्ञापत्राव्दारे लोक कल्याणाची मुल्ये रूजविणारा राजा म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांकडे पाहिले जाते. आजची परिस्थिती लक्षात घेता आज्ञापत्रातील मुद्दे आजही लागू पडतात. बहूआयामी असे हे कर्तूत्व मना-मनात नैतिकता रूजवल्या शिवाय राहत नाही असे विचार शिक्षणाधिकारी श्री विठ्ठल भुसारी यांनी मांडले. (vnsnews-24, feature, nanded ) 





महावितरणच्या विद्युत भवन परिसरात शिवजन्मोत्सव सोहळा मोठया उत्सहात पार पडला. महावितरणचे सेवानिवृत्त मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच कल्याण परिमंडळाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर, अधीचक अभियंता सुधाकर जाधव, महापारेषणचे मुख्य अभियंता अविनाश निंबाळकर, अधीक्षक अभियंता मिलिंद बनसोडे, हिंगोली मंडळाच्या प्रभारी अधीक्षक अभियंता रजनी देशमूख, कार्यकारी अभियंता जे.एल.चव्हाण, आर.पी.चव्हाण, तिडके यांची प्रमूख उपस्थिती होती. याप्रसंगी शिवचरित्रावर बोलताना विठ्ठल भुसारी म्हणाले की, छ.शिवाजी राजांचा इतिहास हा प्रस्थापितांनी चुकीच्या पघ्दतीने रूजवला. कुठल्याही महामानवाला संपवायचे असेल तर त्यांचे दैवीकरण करण्याचा इतिहास आहे. 






त्यामुळे शिवप्रेमिंनी नव्याने संशोधन करून नव्याने इतिहास मांडला पाहिजे. महाकवी वामनदादांच्या “ शिवरायांच्या छायेखाली कधीच नव्हती वाण, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान” या गिताचा संदर्भ देत भुसारी म्हणाले की, जातीपातीचे दोरखंड तोडून अठरापगड जातीतील मावळयांना सोबत घेवून सर्व समावेशक भूमिका घेत रयतेचे स्वराज्य निर्माण केले. 







धान्याची कोठारे निर्माण करून दुष्काळात रयतेमध्ये धान्य वाटप करणारे छ.शिवाजी महाराज हे पहिले राजा होते. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटना लिहिताना शिवाजी महाराजांचे स्वराज्य नजरेसमोर असल्याने घटना लिहने मला सोपे गेले असा संदर्भ देत, जयंती ही एवढ्यासाठीच करायची असते जेणेकरून त्या-त्या महापूरूषांचा एखादा विचार आपल्याला आत्मसात करता यावा. 





शिक्षणाने विवेक जागृत होतो, तर्कबुध्दी विकसीत होते.त्यामुळे उत्सवाच्या नावाखाली अंदाधूंद जयंत्या साजऱ्या केल्या जातात. आता डीजेच्या तालावर नाचून नव्हे तर पुस्तके वाचून साजरा करण्याचा काळ आहे सांगत महापुरूषांना समजून घ्यायचे असेल तर केवळ सिरीयलवर अवलंबून न पुस्तके वाचा असा सल्लाही त्यांनी दिला. अध्यक्षीय समारोप करताना श्री गणेशकर यांनी, अफजलखानाचा कोथळा, शाहीस्तेखानाची छाटलेली बोटे, सुरतेची लूट एवढ्यावरच मर्यादीत नसून महाराजांचं कर्तूत्व हे अफाट आहे. ते एक उत्कृष्ट प्रशासक, अभियंते, पर्यावरण संरक्षक, आमावश्येला स्वाऱ्या करणारे बुध्दीप्रामान्यवादी यौध्दे होते. लोक कल्याण हाच त्यांच्या राज्यकारभाराचा पाया होता. शिवाजी महाराजांचा आदर्श सर्वांनी आचरणात आणावा असे आवाहनही केले.






याप्रसंगी शिवश्री शिवराज शिंदे यांचा शाहिरी पोवाड्याचा कार्यक्रमही संपन्न झाला. या शिवजन्मोत्सव सोहळयाचे प्रास्ताविक अभियंता राजकुमार पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन उपअभियंता पांडूरंग बोडके यांनी केले. प्रास्ताविक उपकार्यकारी अभियंता  स्नेहा हंचाटे व अभियंता विद्या काळे यांनी केले. कार्यक्रम यशश्वीतेसाठी महेश वाघमारे पाटील, शंकर कदम, महेश औरादे,  प्रमोद क्षिरसागर, गिरीष डोणगावकर, कैलास मोरे, निवृत्ती जाधव, सुभाष शिंदे, नाना चट्टे, राजू शिंदे, सुनिल लंगडे, वैभव मोरे व समस्त शिवशंभू वीज प्रतिष्ठानच्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले. या सोळळयास अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटूंबियांनी मोठया प्रमाणावर उपस्थिती लावली होती.     





Post a Comment

0 Comments