Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/विविध मागण्यांसाठी शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू





परभणी ➡️ महाराष्ट्र राज्य अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी महासंघाच्या वतीने प्रलंबित विविध मागण्यांसाठी सोमवार (दि.२०) पासून बेमुदत काम बंद संपाला सुरुवात झाली आहे. पुकारण्यात आलेल्या या संपात श्री शिवाजी महाविद्यालयातील सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी झाले आहेत. विशेष उद्या मंगळवार (दि.२१) पासून बारावी बोर्डाच्या परीक्षा सुरू होत आहेत. या संपाचा परिणाम या परिक्षांवर होणार आहे. त्यामुळे शासन काय निर्णय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (vnsnews-24, education, parbhani ) 






येथील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर सोमवार (दि.२०) रोजी शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाला सुरुवात झाली आहे. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापकांनी ही या संपास पाठींबा असल्याचे सांगितले. यावेळी पत्रकारांशी बोलताना महासंघाचे महाविद्यालय अध्यक्ष गजानन जाधव म्हणाले, सदरील संप कर्मचाऱ्यांसाठीची आश्वसित योजना, १०,२०,३० लाभ योजना, सातवा वेतन आयोग संपूर्ण लाभ, जुनी पेंशन योजना, रिक्त कर्मचारी पद मान्यता यासह इतर मागण्या आणि विविध घोषणाच्या अंमलबजावणी बाबतीत शासनाला धारेवर धरण्यासाठी पुकारण्यात आल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.  






यापूर्वी शासनाने अनेकदा योजना लागू करण्याच्या बाबतीत निर्णय घेतले पण आम्हाला नारळ देत लागू केली नाही याबाबतीत कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे. आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत राज्यातील सर्वच कर्मचारी बेमुदत संपावर असतील असे मत संघटनेचे एकनाथ देवकर यांनी व्यक्त केले.




सदरील संपात महासंघाचे सर्व कर्मचारी सहभागी होते. यावेळी बी.के.बल्लाळ, येलेवाड, रामभाऊ रेंगे, मधुकर देशमुख, रवींद्र तिळकरी, बाळकृष्ण पोखरकर, बाळासाहेब बारहाते, दासू मस्के, अशोक कलंबरकर, प्रल्हाद काळे, अच्युत तरफडे, सय्यद सादिक, तुकाराम ढाकरे, बी.एन. पल्लेवाड, एस जी.कुरवाडकर, अमोल पवार, विकास बाहेकर यांच्यासह बहुसंख्येने कर्मचारी सहभागी होते.







Post a Comment

0 Comments