Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/छत्रपती शिवाजी महाराज जन्मला येत नाहीत घडवावे लागतात - व्याख्याते अविनाश भारती




जिंतूर ➡️ छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रेरणा मानणाऱ्या मावळ्यांना वाटते की महाराजांनी पुन्हा एकदा भारताच्या पावनभूमीवर जन्म घ्यावा.  पण  छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येत नाहीत तर ते घडवावे लागतात कारण याचे मूर्तिमंत उदाहरण त्यांच्या आई जिजाऊ माँ साहेबांनी त्यांच्यावर केलेले संस्कार आहेत असे प्रतिपादन संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटनेने दिनांक 27 फेब्रुवारी रोजी आयोजित केलेल्या व्याख्यान प्रसंगी व्याख्याते अविनाश भारती यांनी केले. (vnsnews-24,feature, parbhani ) 




छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सर्वत्र विविध उपक्रमाने साजरी करण्यात येत असते. याचेच औचित्य साधून संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटनेने 19 फेब्रुवारी पासून विविध उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये सामान्य ज्ञान परीक्षा,भव्य मिरवणूक व दोन दिवस शहरातील नागरिकांसाठी प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.



यावेळी पुढे बोलताना भारती यांनी सांगितले छत्रपती शिवाजी महाराज स्त्रीचा आदर करणारे राजे होते म्हणून आत्ता शिवप्रेमी नागरिकांनी स्त्रीचा आदर केला पाहिजे असे आवाहन त्यांनी यावेळी केले कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली होती.




शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यासाठी, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब काजळे, तालुका अध्यक्ष अँड माधव दाभाडे, शेतकरी आघाडीचे तालुका अध्यक्ष शरद ठोंबरे, संजय काळे, सुनील गाडेकर, पिंटू रोकडे, विजय भांबळे, भगवान रोकडे, संजय गायके, उदय बांगर,अनिल गाडेकर, सारंग आवटे,दामू नवले, अमोल देशमुख, बाबाराव डोंबे, सोपान धापसे, दीपक डोंबे, विष्णू गाडेकर,प्रकाश काळे,संदीप काळे,पिंटू डोंबे,अशोक शेळके,सतीश आदमाणे,बालाजी नव्हाट आदी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी प्रयन्त केले कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा संतोष काकडे यांनी केले तर आभार बाळासाहेब काजळे यांनी मानले.





यावेळी कार्यक्रमास अध्यक्षा म्हणून राष्ट्रवादी युवती जिल्हाध्यक्षा प्रेक्षा भांबळे तर प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी संतोष गाजरे, उपनराध्यक्ष बाळासाहेब भांबळे, मनोज थिटे, विजय खिस्ते, रमेश दरगड,जयानंद मत्रे, दाभाडे सर,वाघ,संभाजी ब्रिगेड चे विभागीय अध्यक्ष बालाजी शिंदे सोसकर, पत्रकार शेख शकील, शेख अलिम, शहजाद पठाण, अंध शाहीर राहुल मोरे , गोविंद खापरे यांची उपस्थिती होती. 





Post a Comment

0 Comments