Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/अनाधिकृतरित्या पानटपरी काढल्यामुळे मनपाच्या मुख्य स्वच्छता निरिक्षकास मारहाण; पाच जणांविरोधात गुन्हा दाखल





परभणी ➡️  शहर महनगरपालिकेचे मुख्य स्वच्छ्ता निरीक्षक करण सखाराम गायकवाड यांना शिवीगाळ करून मारहाण करण्यात आल्याची घटना आज मंगळवारी (दि. 28) सकाळी 6.45 वाजता शहरातील नवा मोंढा परिसरात घडली आहे. या संदर्भात गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात माजी नगरसेवकासह 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (vnsnews-24, crime, parbhani ) 



याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी (दि.27) रामविलास शेडमलजी आग्रवाल उर्फ टिल्लु अग्रवाल (रा. नवामोंढा परभणी) यांनी महानगर पालिका कार्यालयास  तक्रारी अर्ज दिली होती. नवामोंढा भागामधील त्यांच्या ऑइल मिल समोर असलेल्या रोडवर अनील मुक्ताराम शिंदे (रा. नवामोंढा) यांची अनाधिकृतरित्या पानटपरी उभारल्याची  तक्रार केली असू ती हटवण्याकरिता वरिष्ठांच्या आदेशाने मनपाचे मुख्य स्वच्छ्ता निरीक्षक गायकवाड हे तिथे गेले होते. 




पानटपरी जप्त करुन मनपा कार्यालयाकडे पानटपरी घेवून जात असताना आज मंगळवारी सकाळी 6.54 वाजता समद हॉस्पिटल समोरील रोडवर 4 ते 5 जणांनी ट्रॅक्टर अडवून गैरकायद्याची मंडळी जमवुन शासकीय कामात अडथळा निर्माण करुन गायकवाड व सोबतचा स्टाफ हे सर्व शासकीय कर्मचारी असल्याचे माहीत असताना देखील त्यांना शिवीगाळ करुन गायकवाड यांना थापडबुक्याने तोंडावर, पाटीवर, मानेवर, पोटात मारहाण केली व पोलीस ठाण्याला तक्रार देण्यास गेलास तर तुझी खैर नाही अशी धमकी दिली, असे तक्रारीत म्हटले आहे. 




आरोपींविरोधात तत्काळ गुन्हा दाखल करून अटकेच्या मागणीसाठी मनपा कर्मचाऱ्यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात मोठी गर्दी केली होती. त्यानंतर रामभाऊ रेंगे, अक्षय रामभाऊ रेंगे,  अनिल मुक्ताराम शिंदे, सुनील मुक्तीराम शिंदे व अन्य  एक अनोळखी  अशा एकूण 5 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.







Post a Comment

0 Comments