Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ समृध्द भारत घडविण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा-गिरीश प्रभुणे





अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या 57 व्या प्रदेश अधिवेशनाचे उदघाटन

परभणी ➡️ ऋषिमुनींनी दिलेली ज्ञानसंपन्नता व समृध्दी पुन्हा मिळविण्यासाठी युवकांनी कोलंबसप्रमाणे आजच्या भारताचा शोध घेतला पाहिजे. देशाच्या कानाकोपर्‍यात, जनजातींकडे जावून भारतीयता शोधून त्याचे वर्धन करावे आणि शिक्षण व सामाजिक समरसतेच्या माध्यमातून सर्व प्रकारची समृध्दी आणावी असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी केले. (vnsnews-24, feature, parbhani ) 



परभणी शहरातील विष्णू जिनिंगच्या मैदानावर संत जनाबाई नगरीत आयोजित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या देवगिरी प्रांताच्या 57 व्या तीन दिवसीय अधिवेशनाचे  उद्घाटन आज शुक्रवारी (दि. 20) श्री.प्रभुणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.



याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे सहकारमंत्री अतुल सावे यांची उपस्थिती होती. व्यासपीठावर स्वागताध्यक्ष आ.मेघना बोर्डीकर, अभाविपचे राष्ट्रीय संघटन मंत्री आशिष चौहान, प्रदेशाध्यक्ष प्रा.सचिन कंदले, प्रदेश मंत्री नागेश गलांडे, शहराध्यक्ष प्रा.गिरीश कौसडीकर, स्वागत समिती सचिव अमोल जोशी, शहर मंत्री अभिषेक बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. 




प्रभुणे यांनी भारतात पुर्वापारपासून ज्ञानसंपन्नता होती याची काही उदाहरणे देत निरनिराळ्या जाती-जमातींची वैशिष्टे सांगितली. वेरूळ -अजिंठ्याच्या कलाकृती 22 प्रकारच्या ज्ञानसंपन्न ज्ञातींनी साकारलेल्या असून या दगडांतून भारतीय तत्वज्ञान व्यक्त होते. हजारो वर्षांपुर्वी आपला भारत खूप समृध्द होता.





प्राचीन काळात ऋषिमुनींनी केलेले संशोधन आत तंतोतंत खरे ठरले आहे. ज्ञानसंपन्न आणि अज्ञानात अडकलेला भारत असे दोन भाग अभ्यासण्याचे आवाहनही त्यांनी केले. आजच्या काळात सर्व विद्यापीठे ओस पडलेली असून कुठेही नोबेलच्या तोडीचे संशोधन होताना दिसत नसल्याची खंतही प्रभुणे यांनी व्यक्त केली. यामुळेच समृध्द भारत घडविण्यासाठी युवकांनी संशोधनासाठी पुढाकार घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.







Post a Comment

0 Comments