Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/आधार नोंदणी करून दहा वर्षे झालेल्या नागरिकांनी केवायसी अपडेट करून घेणे आवश्यक - जिल्हाधिकारी अभिजीत राऊत





नांदेड (27 Dec 2022) ➡️ ज्या नागरिकांनी आधार नोंदणी करून दहा वर्षे पूर्ण केले आहेत, त्यांनी आपले आधार केवायसी अपडेट करून घ्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय आधार समितीचे अध्यक्ष अभिजीत राऊत यांनी केले. (vnsnews-24, gov, nanded) 



या आधार नोंदणीबाबत माहिती व तंत्रज्ञान विभागाचे उपसंचालक यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे निर्देश दिले आहेत. जिल्ह्यातील नागरिकांनी आधारबाबत काही समस्याचे निराकरण करण्यासाठी टोल फ्री क्रमांक 1947 व ईमेल आयडी help@uidai.in  यावर संपर्क करावा. (vnsnews-24, gov, nanded ) 



आधार सेवेसाठी शुल्क ही पुढीलप्रमाणे आहे. नवीन आधार नोंदणी व अनिवार्य बायोमॅट्रिक अपडेट डेमोग्राफिक अपडेटसह किंवा त्याशिवाय ही मोफत आहे. डेमोग्राफिक अपेडट नाव, पत्ता, जन्म दिनांक, लिंग, मोबाईल क्रमांक, ई-मेलसाठी 50 रुपये तर बायोमॅट्रिक अपडेट डेमोग्राफिक अपडेटसह किंवा त्याशिवाय शंभर रुपये शुल्क आहे. (vnsnews-24, gov, nanded ) 



एकाचवेळी किंवा त्यापेक्षा जास्त माहिती बायोमॅट्रिक / डेमोग्राफिक अपडेट करणे ही एकच विनंती मानली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.








Post a Comment

0 Comments