Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

बाल गृहातील अनाथ मुलांसोबत रंगपंचमी साजरी करणार प्रहार जनशक्ती पक्ष  




परभणी ➡️ शहरातील जुना पेडगाव रोड व वसमत रोड वरील बाल गृहातील अनाथ मुलांना चांगल्या प्रकारे रंग पंचमी साजरी करण्यात यावी. हा सण त्या मुलांना समाजातील एक घटक म्हणून साजरा करता यावा यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आज या दोन्ही बाल गृहात नैसर्गिक कोरड्या रंगाचे वाटप करण्यात आले आहे.



बाल गृहात असलेली बालके ही समाजातील दुर्लक्षित घटक आहेत. या मुलांना आपण समाजातील एक घटक असून सामान्य मुलांसारखे आपण ही प्रत्येक सण आनंदात साजरे करू शकतो व या साठी समाज आपल्या प्रत्येक सुख दुःखात आपल्या सोबत आहे ही भावना या मुलाच्या मनात निर्माण व्हावी या उद्देशाने प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने या अनाथ मुलांसोबत प्रत्येक सण साजरा केला जातो.



उद्याची रंगपंचमी प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते बाल गृहातील या अनाथ मुलांसोबत साजरे करणार आहेत. त्या साठी या मुलांकरिता रंगांची व अल्पोहरची व्यवस्था उद्या या बाल गृहात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात येणार आहे.



या वेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, जिल्हा बाल हक्क समिती चे अध्यक्ष ॲड संजय केकाण, मिडिया प्रभारी नकुल होगे, शहर चिटणीस वैभव संघई, बाल गृह अधीक्षक पांडूरंग ढाकणे, सुरेश वाघमारे, रघूनाथ मुंढे, विनोद दुधकवर,अफसर, राठोड मॅडम यांच्या सह बाल गृहातील कर्मचारी उपस्थित होते.






Post a Comment

0 Comments