Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

शाळांनी शैक्षणिक गुणवत्ता वाढीवर भर द्यावा - सीईओ शिवानंद टाकसाळे यांच्या सूचना 




✳  जिल्ह्यातील शिक्षण विभागाच्या अधिकारी - कर्मचाऱ्यांची संवाद बैठक संपन्न 

परभणी ➡️ मागील दोन वर्षांमध्ये कोविडच्या प्रादुर्भावामुळे शाळा, विद्यार्थी आणि पालक यांची शैक्षणिक दुरावस्था झाली. त्यामुळे ही दुरावस्था भरून काढण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांनी परस्पर समन्वय साधून जिल्ह्यातील शाळांनी शैक्षणिक गुणवत्ता वाढीवर भर देण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत.




गुरुवार दि. 17 मार्च  रोजी स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून लोकसहभागातून शैक्षणिक गुणवत्ता विकास प्रक्रियेच्या अंमलबजावणीसाठी  मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत आणि  शिक्षण विभागातील अधिकारी - कर्मचाऱ्यांच्या संवाद बैठकीचे आयोजन जिल्हा परिषदेच्या सभागृहात करण्यात आले होते.  यावेळी सर्व तालुक्यातील गट शिक्षण अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.




उपस्थितांशी संवाद साधतांना मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे म्हणाले कि, ग्रामीण भागामध्ये शाश्वत विकासासाठी शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी शाळांबरोबर शिक्षकांनी पुढाकार घेणे महत्वाचे आहे. ग्रामीण भागात बहुतांश विद्यार्थी हे शासकीय जिल्हा परिषदेच्या शाळेतच शिक्षण घेत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात लोकसहभाग आणि ग्रामपंचायतीच्या पुढाककराने शाळेचा भौतिक विकास झालेला दिसून येत आहे. परिणामी विद्यार्थांना चांगले शैक्षणिक वातावरण मिळण्यास मदत होत आहे. 




शैक्षणिक गुणवत्ता वाढीची प्रक्रिया प्रभावी ठरण्यासाठी जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांना व विद्यार्थांना या प्रक्रियेचा फायदा होण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून लोकसहभागातून शैक्षणिक गुणवत्ता विकास करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्याच्या सूचना यावेळी शिवानंद टाकसाळे यांनी दिल्या आहेत.








Post a Comment

0 Comments