Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

एचएआरसी संस्थेने समाजातील दुर्लक्षित घटकातील बालकांसोबत साजरी केली होळी





परभणी ➡️ आपण नेहमीच म्हणतो की 'ये रंग ना माने कोई जात ना बोली. मुबारक हो आपको हॅपी होली' तर आज याचीच प्रचिती एचएआरसी संस्थेतर्फे आयोजित होळी च्या कार्यक्रमात आली. आज आपना कॉर्नर येथे सेतू संस्थेच्या हॉल मध्ये होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज संस्थे तर्फे परभणी शहरातील 100 वंचित, एक पालक व दुर्लक्षित घटकातील विशेषतः FSW अर्थात वारांगनाच्या वंचित बालकांसोबत होळी व रंगपंचमी साजरी करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 






होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च  अँड चॅरिटीज संस्थेच्या वतीने महापुरुषांच्या जयंती, भारतीय सण तसेच विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने समाजातील वंचित बालकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जातात. होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज संस्था मागील 13 वर्षा पासून एचआयव्ही संक्रमित बालके, निराधार विधवा महिला व अनाथांच्या मूलभूत प्रश्न शिक्षण, आरोग्य व पुनर्वसनपर गरजांसाठी नियमितपणे प्रयत्न करते. तसेच एचएआरसी संस्थे तर्फे आजवर  महाराष्ट्रातील अनेक विशेष बालगृहातील एचआयव्ही ग्रस्तांच्या शिक्षण, आरोग्य व पुनर्वसन साठी वेळोवेळी मदत  केली जात आहे. 



एचएआरसी संस्थे तर्फे या प्रसंगी उपस्थित मुलांना मान्यवरांच्या हस्ते रंग लावून व रंगांची उधळण करत होळी व रंगपंचमी साजरी करण्यात आली. तसेच ही सर्व मुले वंचित घटकातील विशेषतः परभणीतील रेड लाईट एरिया मधील असून त्यांना देखील होळीचा आनंद घेता यावा म्हणून सर्व 100 मुलांना नैसर्गिक रंग, पिचकारी व 2 किलो विविध ऋतूनुसार उपलब्ध ताजी फळे वाटप करण्यात आली. 



प्रस्तावना करतांना एचएआरसी संस्थेचे अध्यक्ष डॉ पवन चांडक यांनी  वंचित बालकांसाठी आयोजित एचएआरसी संस्थेच्या विविध उपक्रमांविषयी माहिती देताना म्हणाले "समाजातील वंचित, दुर्लक्षित घटकातील बालकांना शिक्षण, आरोग्य व पोषक आहार विषयक गरजांसाठी जी पण मदत लागेल ती एचएआरसी संस्थेतर्फे पुरविली जाईल. तसेच या बालकांनी  नियमितपणे अभ्यास करून स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. आपल्या सुख दुःखात एचएआरसी संस्था सदैव आपल्या सोबत आहे". 



या प्रसंगी सेतू संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.  या उपक्रमाच्या यशस्वीततेसाठी एचएआरसी संस्थेचे अध्यक्ष डॉ पवन चांडक, प्रा राजेश्वर वासलवर, ऍड चंद्रकांत राजुरे, सत्यनारायण चांडक, सुहास कारंजे, सेतू चे रफिक शेख यांनी प्रयत्न केले.






Post a Comment

0 Comments