Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

नवाज काॅलनी व गौस काॅलनी येथील वाकलेले पोल व वायर केबल दुरुस्त करण्याची लोकश्रेयची मागणी 




परभणी ➡️ दर्गा परिसरातील खाजा गरीब नवाज काॅलनी आणि गौस काॅलनी येथे लाईटची पोल वाकले म्हणून हाताला लागेल एवढे खाली केबल वायर आले आहे. त्यामुळे भविष्यात कोणताही अपघात होऊ शकतो. या संबंधित लोकश्रेय मित्रमंडळाकडून 15 मार्च रोजी महावितरण कंपनीला निवेदन देऊन हे पोल ठिक करण्याची मागणी केली गेली आहे. या संदर्भात कनिष्ठ अभियंता यांनी लवकर कार्यवाही करू असे आश्वासन दिले.  






दर्गा परिसरातील झोन क्रमांक 3 मध्ये महानगर पालिकेचे प्रभाग क्रमांक 11 मधील मुसत्फा डी.पी. वरील खाजा गरीब नवाज काॅलनी येथील फेरोज यांच्या घरासमोरील रोड वर हाताला केबल वायर लागत आहे.  तसेच लोखंडी पोल वाकलेल्या अवस्थेत असल्याने मनुष्य प्राणहानी होऊ शकते. 







हा अपघात टाळण्यासाठीच झोन क्रमांक तीन च्या कनिष्ठ अभियंता रुपाली चापेकर यांच्या कडे लोकश्रेय मित्र मंडळाच्या वतीने भेट घेऊन मागणी करुन निवेदन देण्यात आले. या शिष्टमंडळात लोकश्रेय मित्र मंडळचे संस्थापक अध्यक्ष सलीम इनामदार, शेख अहेमद,  शेख सरवर यांची उपस्थिती होती. 



याच परिसरातील टीचर काॅलनी येथील या डी. पी. वरील गौस काॅलनी येथील शेख अहेमद यांच्या निवासस्थाना समोरील परिसरातील सीमेंट चे पोल वाकल्याने व तेथील केबल वाकल्याने तेथे ही एखाद्या वाहनाचा धक्का लागला तर वाहना सह जिवीत हानी होवुन मोठा अपघात होवु शकतो. 


 


हे सर्व प्रकार दुरुस्त करण्यात यावे अशी मागणी करुन या निवेदनावर सलीम इनामदार,  शेख अहेमद आणि शेख सरवर यांच्या स्वाक्षऱ्या असुन कनिष्ठ अभियंता रुपाली चापेकर यांनी येत्या काही दिवसांतच ही समस्यांचा निपटारा करण्यात येईल असे आश्‍वासन दिले आहे. 






Post a Comment

0 Comments