Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

'दिव्यांगांच्या संसाराची घडी शिवसेना व्यवस्थित बसवणार.' - आ. डॉ. राहुल पाटील.




राज्यस्तरीय दिव्यांग वधु-वर परिचय मेळावा संपन्न

 परभणी  ➡️ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधत माझ्या संकल्पनेतून सर्वधर्मीय राज्यस्तरीय दिव्यांग वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन आपण केले होते. आज शनिवारी अक्षदा मंगल कार्यालयात आयोजित मेळाव्याला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला. राज्यभरातून 723 दिव्यांग वधू-वरांनी आपल्या नावाची नोंदणी करून परिचय मेळाव्यात सहभाग घेतला. त्यानंतर 16 दिव्यांगांचे विवाह याच कार्यक्रमात जुळवण्यात आले.




"कोणताही सामाजिक उपक्रम हा कार्यक्रम पुरता मर्यादित न राहता चळवळ म्हणून स्वीकारला पाहिजे. समाजात क्रांती घडवायची असेल, तर आधी विचार पक्का असला पाहिजे. सक्षम माणसांपेक्षा दिव्यांगांना अधिक सामाजिक जाण आहे. समाजातील दुर्लक्षित घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट करण्यासाठी त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे, विविध शासकीय योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. येत्या काळात दिव्यांगांना रोजगार मिळावा यासाठी एक अद्ययावत वेबसाईट लॉन्च करणार असून त्यांचा हक्क त्यांना प्राप्त करून देण्यासाठी त्यांच्या संसाराची घडी व्यवस्थित बसण्यासाठी शिवसेना तत्पर आहे.." असे प्रतिपादन यावेळी बोलताना केले.




स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आजच्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांना अभिवादन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले.




यावेळी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी या कार्यक्रमाचे कौतुक केले. "प्रशासनाने लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून दिव्यांग मुलांच्या कल्याणासाठी खूप काही करता येईल. परभणी जिल्ह्यामध्ये लवकरच दिव्यांगांसाठी पुनर्वसन केंद्राची निर्मिती करणार आहोत. प्रत्येक दिव्यांग हा आत्मनिर्भर होण्यासाठी जिल्हा प्रशासन कार्य करेल. अतिशय कमी वेळेत राज्यस्तरावरील या दिव्यांग बांधवांच्या वधू-वर परिचय मेळाव्याचे व्यवस्थित आयोजन केल्याबद्दल मी आ.डॉ. राहुल पाटील व सहकाऱ्यांचे अभिनंदन करते," या शब्दांत मा. जिल्हाधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.




कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. संजय जाधव साहेब तर प्रमुख पाहुणे 'वनामकृवि'चे कुलगुरू डॉ. अशोक ढवण, जिल्हाधिकारी आंचल गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, मनपा आयुक्त देविदास पवार, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईचे दिव्यांग कल्याण समन्वयक विजय कान्हेकर यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमासाठी आमच्या युवासैनिक व शिवसैनिक तसेच पदाधिकाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेतली त्या सर्वांचे मी आभार मानतो.





Post a Comment

0 Comments