Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

जिंतूरात भाजप आणि राष्ट्रवादी यांच्या समर्थकांमध्ये राडा, निवडणुकीत भाजपाचे उमेदवार विजय












किरकोळ कारणावरून दोघांचे समर्थक एकमेकांना भिडल्याने जिंतूरमध्ये तणावाचे वातावरण आहे. दोन्ही पक्षाच्या समर्थकांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमारही करावा लागला. या पार्श्वभूमीवर जिंतूरमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.



जिंतूर शहरातील जिल्हा परिषद प्रशालेच्या मतदान केंद्रावर जिंतूर औद्योगिक वसाहतीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या निमित्ताने मतदान प्रक्रिया सुरू होती. मतदान प्रक्रियेसाठी भाजप नेते रामप्रसाद बोर्डीकर व माजी आमदार विजय भांबळे हे स्वतः उपस्थित होते.




यात आज वसाहतीचे मतदान सुरू असताना मतदान केंद्र समोरील मंडपात विजय भांबळे व बाळू भांबळे हे दोघे बसलेले होते. सकाळी 9 वाजण्याच्या दरम्यान दोन्ही गटाचे कार्यकर्ते भिडले. किरकोळ दगडफेक झाली. पोलीस पोलिस याठिकाणी तात्काळ पोहोचले. लाठीचार्ज करून पोलिसांनी जमाव पांगविला. अश्रू गॅसच्या नळकांड्या पोलीसांनी फोडल्या. सध्या तणावपुर्ण परिस्थिती आहे.




माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी सर्वच्या सर्व जागा पटकावून या संस्थेवर स्वतःचे निर्विवाद वर्चस्व 







जिंतूर - औद्योगिक वसाहत सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणूकीत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी सर्वच्या सर्व जागा पटकावून या संस्थेवर स्वतःचे निर्विवाद वर्चस्व राखले आहे.





या संस्थेच्या संचालक मंडळाच्या एकूण 11 जागांकरीता रविवारी (दि.27) मतदानाचा टप्पा होता. त्याप्रमाणे सकाळी मतदानास प्रारंभ झाला. परंतु, जिल्हा परिषद प्रशालेच्या मतदान केंद्रावर बोर्डीकर व राष्ट्रवादीचे माजी आमदार विजय भांबळे या दोघात समोरासमोर वाद-विवाद, हमरी-तुमरी, शिवीगाळ, धक्काबुक्की पाठोपाठ हाणामारी झाली. 





त्यानंतर दोघांचेही समर्थक भिडले. लगेच दोन्ही बाजूंनी दगडफेक झाली. परंतु, पोलिसांनी लाठीमार केल्यानंतर कार्यकर्ते पसार झाले. या केंद्रावर मतदान सुरळीतपणे पार पडले. दुपारी सहकार खात्याच्या अधिकार्‍यांनी मतमोजणी करीत निवडणूकीचा निकाल जाहीर केला. 





त्यात बोर्डीकर गटातील धरमचंद आच्छा, आम्रपाली प्रभाकर आंबोरे, शितल रवी घुगे, संतोष मारोतराव घुगे, सुरेखा पंडीत दराडे, कासाबाई किशनराव बुधवंत, सुनीता रामराव शिंदे, सोनल सिध्दार्थ अच्छा, रेणूका कैलास आदमाने, राजाभाऊ सखारा कुर्‍हे व सुमन दत्तात्रय बार्शीकर हे बोर्डीकर गटाचे उमेदवार बहुमताने विजयी झाले. 





या निवडणूकीत विजय भांबळे यांचे उम्मेदवार दिपक कोकडवार, रघुनाथ बडे, सुधाकर वट्टमवार, सुरेखा दिपक कोकडवार, अल्पना राजेश वट्टमवार, लक्ष्मण साहेबराव भालेराव, अशोक उध्वराव घुगे हे पराभूत झाले. या संस्थेत सोसायटी मतदारसंघातून मीना रामप्रसाद बोर्डीकर या यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्या. तर अनुसूचित जाती/जमातीसाठी दोन्ही गटाकडून एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे हे पद रिक्त राहीले, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी दिली.






Post a Comment

0 Comments