Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

सेलूतील तरूणाने तयार केले बांबू ऑटो कटर यंत्र




 सेलू   श्रीपाद रोडगे ) ➡️ बांबूच्या लाकडापासून विविध प्रकारच्या वस्तू तयार करण्यासाठी कुटिरोद्योजक व शेतकरयांना आवश्यक असलेले " बांबू कटर यंत्र"  सेलूतील तरूणाने तयार केले आहे. 

 



येथील मोक्ष पवनकुमार साधवानी या विश्वकर्मा विद्यापीठ पुणे येथे प्रॉडक्ट डिझाइनींग च्या अंतीम वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांने हे महत्वपुर्ण यंत्र तयार करण्यात यश मिळवले आहे. पारंपारिक शेती बरोबर आता मराठवाड्यात अपरिचित असलेल्या "बांबू शेती" कडे  अनेक शेतकरी वळले आहेत. 



अगरबत्ती, आकाशकंदील , काडीपेटी, टुथब्रश, शालेय साहित्य, आईसक्रीम स्टीक, घरगुती वापराच्या तसेच घर सजावटीच्या अनेक वस्तू तयार करणारे कुटिरोद्योजक व  शेतकरयांना बांबू पासून रॉमटेरीयल तयार करण्यासाठी हे यंत्र वरदान ठरणार आहे.



अँडव्हान्स टेक्नॉलॉजीचा उपयोग करून हे यंत्र तयार केले असून एकावेळी एकाच मशीन वर वेगवेगळी कामे करता येतात. त्यामुळे  सुशिक्षित बेरोजगार तरुण व महिलांना देखील या यंत्राच्या सहाय्याने स्वयंरोजगार करता येणार आहेत.



हे यंत्र तयार करण्यासाठी मोक्ष साधवानी यांना विश्वकर्मा विद्यापीठातील प्राध्यापक वृंदांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल  श्री चंद्रप्रकाश सांगतानी, प्रमोद सांगतानी यांनी कौतुक केले.






Post a Comment

0 Comments