Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

सेकंडरी स्कूल एम्पलॉइज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडचे सभासद प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित




पुणे ➡️ सेकंडरी स्कूल एम्पलॉइज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबई शाखा पिंपरी चिंचवड सभासद प्रशिक्षण आणि गुणगौरव समारंभ शनिवारी रोजी गोदावरी हिंदी स्कूल चिंचवड येथे संपन्न झाला




या प्रसंगी महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ पुणे जनरल सेक्रेटरी व नवनिर्वाचित सेकंडरी स्कूल एम्पलॉइज कॉपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड मुंबई अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा सन्मान सोहळा पिंपरी चिंचवड शहर क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ वतीने महासंघाचे राज्य सचिव चांगदेव पिंगळे, अध्यक्ष अंगदराव गरड पाटील तसेच पुणे विभाग पदाधिकारी अशोक पाटील तसेच मुख्याध्यापक अशोक जाधव यांच्या वतीने करण्यात आला. या कार्यक्रमातनवनिर्वाचित अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला.




तसेच पिंपरी-चिंचवड मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष साधना दातीर उपाध्यक्ष अशोक जाधव, मुख्याध्यापकांसह गद्ररे, संभाजी पडवळ, गायकवाड, नाना शिवले,  बशे,  कलंत्रे,  आवदेश पांडे, गोदावरी हायस्कूल च्या प्राचार्या कुसूम तिवारी यांच्या उपस्थित कार्यक्रम संपन्न झाला.




या कार्यक्रमाचे आभार संचालक तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे जिल्हा अध्यक्ष गुलाबराव गवळे यांनी मानले आणि राष्ट्रगीत म्हणून कार्यक्रम संपला. यावेळी सेकंडरी पतपेढीचे नवनिर्वाचित सर्व पदाधिकारी संचालक मंडळ मोठ्या संख्येत उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments