Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

परभणीत  स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव व महिला दिनानिमीत्त  महापालीकेच्यावतीने तीन दिवसीय त्रैभाषीक कविसंमेलन




 


परभणी ➡️ स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीने दिनांक 6 ते 8 मार्च दरम्यान महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये त्रैभाषीक कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती महापालिका आयुक्त देविदास पवार यांनी दिली आहे.





परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीने हे कवी संमेलन आयोजित करण्यात आले असून 6 मार्च रोजी सायंकाळी 7 ते 9.30 या दरम्यान उर्दू कवी संमेलन, दिनांक 4 मार्च रोजी सायंकाळी 7  ते 9.30  हिंदी कवी संमेलन आणि 8 मार्च रोजी सायंकाळी 7 ते 9.30 या दरम्यान मराठी कवी संमेलन होणार आहे.




दरम्याण कविसंमेलन निमीत्त महापालीकेत आयुक्त देविदावस पवार,अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील यांच्या उपस्थित आढावा बैठक घेण्यात आली.या बैठकीला शहरातील मराठी,हिंदी,उर्दु कविंची उपस्थिती होती.या कविसंमेलनात विभागीय पातळीवर कविंना देखील निमंत्रीत करण्यात आले आहे. तसेच स्थानीक कविंचा अधिक सहभाग राहण्यासाठी वाव देण्यात आला आहे.




हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संयोजन समितीचे प्रमुख म्हणून उपायुक्त प्रदिप जगताप,सहायक आयुक्त शिवाजी सरनाईक,अल्केश देशमउख, मुक्तसिद खान,वैद्यकीय अधिकारी डॉ.कल्पना सावंत,एन.यु.एल विभाग प्रमुख सुभाष मस्के,माहीती व जनसंपर्क अधिकारी राजकुमार जाधव,भांडार प्रमुख रामेश्वर कुलकर्णी हे नियोजन समितीवर काम करणार आहेत.अधिक माहीती साठी जनसंपर्क अधिकारी राजकुमार जाधव यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

 जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून हे संमेलन होत असून महिलांसाठी सप्ताहात विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत.तसेचत महिला आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात येणार आहे. या कवी संमेलनामध्ये महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयुक्त पवार यांनी केले.




Post a Comment

0 Comments