Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

वै. धुंडामहाराज महाविद्यालयास अंतरमहाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धेत प्रथम पुरस्कार




 

 देगलूर  ➡️ स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड आणि महात्मा गांधी महाविद्यालय अहमदपूर  जि. लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि. 24 फेब्रुवारी रोजी अहमदपूर येथे अंतरमहाविद्यालयीन बॉल बॅडमिंटन क्रीडा स्पर्धा संपन्न झाली.



 या बॉल बॅडमिंटन स्पर्धेत महिला गटातून वै. धुंडा महाराज देगलूरकर महाविद्यालयातील निष्पर्णी सुन्नेवार, दीपा मालगीरवार, सुप्रिया तलवारे, शेख सना, कु.सना कौसल, अर्चना राठोड, मोनिका भुरेवार, रेश्मा वाघमारे, कु.युगंधरा बगडे विद्यार्थीनींच्या संघाने प्रथम पारितोषिक पटकावले आहे. 




खेळाडू मुलींनी मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय कुलकर्णी यांनी खेळाडूंचा सत्कार करून गौरवित केले. अवेज हैदरसाब यांनी या खेळाडूंची तयारी करून घेन्यासाठी मदत केल्यामुळे  त्यांचाही गौरव करण्यात आला. 




महाविद्यालयाचे क्रीडा संचालक तथा उपप्राचार्य डॉ. दिलीप भडके यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींनी हे यश संपादन केल्यामुळे महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. हा सत्कार समारंभाला प्रा.डॉ. आतनुरकर,  प्रा.डॉ.रामदिनेवर, प्रा.डॉ.पाटील, प्रा.डॉ.तिडके उपस्थित होते व स्पर्धकांचे सर्वांनी कौतुक केले.





Post a Comment

0 Comments