Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

नूतन शिक्षण संस्थेची पद भरती शासनाच्या पवित्र पोर्टल नुसार होणार या आश्‍वासनानंतर उपोषण मागे




 12 दिवसांच्या ऊपोषणानंतर शालेय प्रशासनास आली जाग 


 सेलू  (श्रीपाद रोडगे ) ➡️ येथील नूतन विद्यालय शाळेसमोर बोगस शिक्षक भरती प्रकरणी चाललेल्या उपोषणास 12 दिवसानंतर उपोषण कर्त्याच्या मागणीला आले. आज नूतन शिक्षण संस्थेची पद भरती शासनाच्या पवित्र पोर्टल नुसार होणाऱ्या आश्वासना नंतर उपोषण मागे घेण्यात आले.



श्रीनिवास उघडे यांनी दिलेल्या निवेदनात विचारलेला माहितीला संस्थेने दिलेले उत्तर मध्ये येथील दैनिकात दिनांक  04 .03 2019  व  5.3.2019  दिलेले जाहिरातीनुसार 2019 पासून एकही कर्मचाऱ्याची नियुक्ती आजतागत करण्यात आलेली नाही. शासनाच्या पवित्र पोर्टल वरून उमेदवार उपलब्ध झाला नाही आणि संस्थेने कुठल्याही कर्मचाऱ्यांची नेमणूक केली नाही.   




बालाजी देऊळगावकर व अंजली ज्ञानेश्वर देशपांडे यांच्या नियुक्तीबाबत चा खुलासा या अनुषंगाने माननीय शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद परभणी जावक क्रमांक जिपप/ सीवि/ मा./2022 दिनांक 17.2.2022 चौकशीचे पत्र प्राप्त झाले आहे. तसेच उपोषण करत्याने मागवलेली कर्मचाऱ्यांची मस्टर यादीची संख्या संस्थेने दिलेले. 




या उत्तरात नुतन विद्यालयात जानेवारी 2020 ला एकुण 66, जानेवारी 2021 एकुण 64 जानेवारी 2022 एकुण 57 व नुतन कन्या प्रशालेचे जानेवारी 2020 एकुण 41,जानेवारी 2021 एकुण 42, जानेवारी 2022 एकुण 39 अशी यादी शासनाच्या वेतन अधीक्षक पथकाकडून मस्टरवर असणाऱ्या व वेतन प्राप्त करणाऱ्या कर्मचाऱ्यांची यादी सोबत जोडून दिली आहे, असे पत्र देऊन आपण निवेदनात दिलेल्या सर्वच मुद्द्याची पूर्तता पूर्ण केल्यामुळे आपण आपल्या उपोषणापासून परावृत्त होऊन शालेय व्यवस्थापनास व प्रशासनास सहकार्य करावे अशा प्रकारचे पत्र शालेय व्यवस्थापन उपोषण करते श्रीनिवास उघडे यांना देऊन नारळ पाणी देऊन उपोषण सोडवण्यात आले आहे. 




याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस एम लोया, संस्थेचे उपाध्यक्ष डि.के.देशपांडे, संस्थेचे सचिव विनायक कोठेकर, संस्थेचे सहसचिव जयप्रकाशजी बियाणी नूतन विद्यालयाचे मुख्याध्यापक सोळंके, उपमुख्याध्यापक एस. व्ही. पाटिल, पर्यवेक्षक के.के. देशपांडे, डी.डी.सोनेकर तसेच नूतन कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका संगीता खराबे यांनी उपोषण कर्त्यांचे सर्व प्रश्नांचे उत्तर लेखी स्वरुपात देऊन नारळ पाणी पाजुन उपोषण सोडवले. या प्रसंगी शहरातील  सामाजिक कार्यकर्ते सुनिल गायकवाड, सतिश जाधव, कृष्णा चव्हाण, शेख खलील, शेख अबरार हे उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments