Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

परभणी महानगर पालीकेच्या स्थायी, प्रभाग समिती सभापती निवडी 4 मार्चला







 परभणी  ➡️ शहर महानगर पालीकेच्या स्थायी समिती सभापती व प्रभाग समिती अ,ब,क सभापती निवडीसाठी जिल्हाधिकारी अचल गोयल यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 4 मार्च रोजी बी.रघुनाथ सभागृहात बैठक होणार आहे.





सभापती निवडीसाठी यापुर्वी ऑनलाईन बैठक होणार होती,परंतु जिल्हाधिकारी तथा पिठासीन अधिकारी स्थायी समिती,प्रभाग समिती अबक निवडणूक 2022 यांनी पृष्ठाकिंत केले नुसार सदर बैठक प्रत्यक्ष सभागृहात होत आहे. 4 मार्च रोजी सकाळी 11 वाजता विशेष बैठक होत आहे. अशी माहीती नगर सचिव विकास रत्नपारखे यांनी दिली आहे.






या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र वितरित करण्यासाठी दिनांक 28 फेब्रुवारी ते 2 मार्च रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत, नामनिर्देशन स्विकारण्याची तारीख व वेळ दिनांक 28 फेब्रुवारी ते 2 मार्च रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत,नामनिर्देशन कोणी व कोठे स्विकारणे नगर सचिव विभाग मनपा मुख्यालय परभणी शहर महानगरपालीका, नामनिर्देशन पत्र परत घेणे.







सभागृहात नामनिर्देश पत्राची छाननी नंतर नामनिर्देशन पत्र वैध असलेल्या उमेदवारांची नावे पीठासीन अधिकारी यांनी वाचुन दाखवल्यानंतर 15 मिनीटांत नामनिर्देशन पत्र सभागृहात पीठासीन अधिकारी यांना लेखी सुचान देवुन परत घेता येतील. मतदान-मतदान घेणे अवश्यक असल्यास पिठासीन अधिकारी निवडणुक लढविणार्या उमेदवारांची नावे वर्णानुक्रमे घोषीत करतील व हात वर करुन मतांची नोंद घेण्यात येईल.






Post a Comment

0 Comments