Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

जिंतूर ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना मोफत भोजन






 जिंतूर  ➡️ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांना व  त्यांच्यासोबत असलेल्या एका व्यक्तीला मोफत भोजन डब्बा देण्याचे महाशिवरात्री निमित्त दिनांक 1 मार्च रोज मंगळवारी ह. भ. प. साईनाथ महाराज वसमतकर यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे .



आनंद दत्त धाम आश्रम श्रीक्षेत्र माहूरगड यांच्या सौजन्याने संत बाळगीर महाराज स्वच्छता अभियान माहूर तर्फे जिंतूर शहरांमध्ये स्वच्छता अभियान सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. 



यानंतर जिंतूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णास व त्यांच्यासोबत एका व्यक्तीला दररोज मोफत डब्बा देण्याच्या कार्यक्रमाचे उद्घाटन ह भ प साईनाथ महाराज माहुरकर यांच्या हस्ते होणार आहे. 



या कार्यक्रमास संपूर्ण जिंतूर तालुक्यातील दत्तसंप्रदाय भक्तांच्या वतीने करण्यात आली आहे . ही सेवा अखंडपणे चालू राहणार आहे. तरी या कार्यक्रमास सर्व भाविक भक्तांनी उपस्थित रहावे असे आवाहन साईनाथ महाराज माहुरकर यांनी केली आहे.




Post a Comment

0 Comments