Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमीत्त महापालिकेच्यावतीने महिलांसाठी महाआरोग्य शिबीर 




परभणी ➡️ शहर महानगरपालिकेच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमीत्त जागतिक महिला दिनानिमित्त महिला सप्ताह आयोजित केले आहे. या अंतर्गत 8 मार्च रोजी महिला आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 



शहरातील 8 आरोग्य केंद्र या ठिकाणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. साखला प्‍लॉट नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, इनायत नगर आरोग्य केंद्र, दर्गा रोड आरोग्य केंद्र, वर्मा नगर, आरोग्य केंद्र शंकर नगर, खानापूर, खंडोबा, आरोग्य केंद्र, मनपा जायकवाडी रुग्णालय येथे हे शिबिर होणार आहे. 




तसेच लहान बालकांची देखील आरोग्य तपासणी या 8 आरोग्य केंद्रात होणार आहे. सकाळी 9.30 ते दुपारी 03 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आली आहे. या शिबिरात किमान दोन वैद्यकीय अधिकारी, विशेष तज्ञ हे महिलांची तपासणी करणार आहेत.





या शिबीरात दंत तपासणी,नेत्र तपासणी,फिजीशन,स्त्री रोग तज्ञ,रक्तदान शिबीर,सर्व प्रकारच्या तपासण्या होणार आहेत.या निमीत्त बैठक पार पडली असून आयुक्त देविदास पवार,अतिरिक्त रणजित पाटली,उपायुक्त प्रदिप जगताप,माहीती व जनसंपर्क अधिकारी राजकुमार जाधव उपस्थित होते. 



या आरोग्य शिबिराचा शहरातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन महापौर अनिता सोनकांबळे,उपमहापौर भगवान वाघमारे, आयुक्त देविदास पवार,  अतिरिक्त रणजित पाटील,  सभागृह नेते सय्यद समी उर्फ माजु लाला,  स्थायी समिती सभापती गुलमीर खान, विरोधी पक्षनेते विजय जामकर, गटनेत्या चांद सुभाना जाकेर लाला,  चंद्रकांत शिंदे, उपायुक्त प्रदिप जगताप आदींनी केले आहे.




Post a Comment

0 Comments