Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

 'मी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष सोडणार नाही'  - विजयकुमार  शिंदे




 पालम  ( आरूणा शर्मा )  ➡️ मागील काही दिवसांपासून विनाकारण मी पक्ष सोडणार असून इतर पक्षात प्रवेश करणार, अशी चर्चा केली जात आहे. मी मनापासून राष्ट्रवादीवर प्रेम करतो. तसेच पक्ष संघटना वाढीसाठी प्रयत्न केला आहे. त्यामुळे हा पक्ष मी सोडणार नाही, अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अँड. विजयकुमार शिंदे यांनी बोलताना दिली आहे.




पालम तालुक्यात जिल्हा परिषद निवडणूक जशी-जशी जवळ येत आहे. तसे तसे राजकीय समीकरण बदलत आहेत. आपल्या सोयीनुसार पक्ष बदल केले जात आहेत. मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मतभेद होत असल्याने अँड. विजय कुमार शिंदे अस्वस्थ असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. यातच पेठ पिंपळगाव हे नवीन जिल्हा परिषद सर्कल होणार असल्याने राजकीय चर्चांना उत आला आहे.



राष्ट्रवादी सोडून शिंदे हे माजी आमदार सीताराम घनदाट यांच्या सोबत गेले होते. ते स्वतः कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहेत.तर त्यांच्या सुविद्य पत्नी अलका विजयकुमार शिंदे या पंचायत समिती पालमच्या विद्यमान सभापती असून पेठ पिंपळगाव हे त्यांचे स्वतः चे मूळ गाव आहे. माजी आमदार सीताराम घनदाट यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. तेव्हापासून विजयकुमार शिंदे हे पक्ष सोडणार आहेत,अशी चर्चा जोरात सुरू आहे.






Post a Comment

0 Comments