Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

जमीन महसूल बुडविल्याने ब्रिक्स कंपनी केली सिलबंद 




वर्धा तहसिल कार्यालयाची कारवाई


 वर्धा  ➡️ तालुक्यातील मौजा दहेगांव मि. येथील शेत सर्व्हे नं.129 क्षेत्र 1.17 आर.चौ.मी. या शेतजमिनीचा अनधिकृत अकृषक वापर केल्या प्रकरणी आकारण्यात आलेला दंड न भरल्याने ब्रिक्स कंपनी सिलबंद करण्यात आली आहे. सदर कारवाई आज तहसील कार्यालय, वर्धाच्यावतीने आज करण्यात आली.





मौजा दहेगाव मि. येथील शेत सर्वे क्रमांक 129 सन 2014 मध्ये चौधरी नामक व्यक्तीद्वारे तहसील कार्यालयामार्फत अकृषक करण्यात आली होती. सदर जागेवर सन एप्रिल 2012 ते जुलै, 2013 पर्यंत अनधिकृतपणे ब्रिक्स कंपनी सुरू होती. त्यामुळे मा.महालेखागार नागपूर यांनी सदर जागेची 85 हजार 995 रुपये लेखा परिक्षा परिच्छेदात प्रलंबित असलेली रक्कम काढण्यात आली. 




कसुरदार यांना वारंवार नोटीस देवूनही सदर रक्कम शासन जमा करण्यास तयार नसल्याने त्यांच्या सातबारा वर सदर रकमेचा बोजा सन 2018 मध्ये चढविण्यात आला. तसेच संबंधित मागील व चालु वर्षाची एकून 2 लाख 12 हजार 375 एवढ्या रकमेची वसूली देण्यास कसूरदार टाळाटाळ करत असल्याचे दिसून आले. 



त्यामुळे महाराट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम -174 अन्वये त्यांना नमुना 1 व 2 च्या नोटीस बजावण्यात आल्या. आज दिनांक 24 फेब्रुवारी रोजी नमुना 3 च्या नोटीस अन्वये कसूरदार यांची मौजा दहेगांव मि. येथील शेत सर्व्हे नं.129 ही मिळकत सिल करण्यात आली. 




सदर कारवाई वर्धा येथील उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांचे निर्देशान्वये व तहसीलदार रमेश कोळपे यांच्या नोटीसद्वारे करण्यात आली. सदर कारवाई दरम्यान मंडळ अधिकारी मोहम्मद शफी, तलाठी यशवंत लडके, कैलास पळसकर, संजय आगलावे, भाग्यश्री लुटे तसेच कोतवाल मुंजेवार, नाखले व सयाम यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

                                                       




Post a Comment

0 Comments