Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

परभणी मनपाअंतर्गत होणार 100 कोटींच्या रस्ते कामांचा रविवारी शुभारंंभ




आमदार सुरेश वरपूडकर यांची पत्रकार परिषदेत दिली माहिती

  परभणी  ➡️ राज्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते 27 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता महानगरपालिके अंतर्गत सुमारे 100 कोटी रुपयांच्या रस्ते कामांचा शुभारंभ दर्गाह परिसरात करण्यात येणार असल्याची माहिती पाथरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश वरपूडकर यांनी आज शुक्रवारी (दि.25) पत्रकार परिषदेत दिली.




या पत्रकार परिषदेमध्ये आ.वरपूडकर यांनी सांगितले की, परभणी महानगरपालिकेअंतर्गत गेल्या 4  ते 5 वर्षात  पिण्याच्या पाणी पुरवठ्याचे महत्वपूर्ण काम झालेले आहे. सध्या 9 जलकुंभांद्वारे दररोज नागरिकांना पिण्याचे पाणी पुरवले जात असून काही ठिकाणी 3 ते 4 दिवसाला पाणी मिळत आहे. 



अर्धवट अवस्थेत असलेल्या जलकुंभांचेही काम पुर्णत्वास गेले असून येलदरी धरणाचे पाणी थेट नागरिकांना मिळू लागले आहे. शहरात पाईपलाईनची कामे करताना बहुतांश रस्ते उखडले असून अतिवृष्टीनेही मुख्य रस्ते खराब झाले आहेत. अशा स्थितीत शहरातील रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुंबईत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत बैंठक घेवून विविध योजनेतून रस्ते कामांसाठी मंजुरी देण्यात आली. 




यात 2 राज्यमार्ग आणि दोन प्रमुख जिल्हा मार्ग (एमडीआर) रस्ते असल्याचे आ.वरपूडकर यांनी यावेळी सांगितले. 80 कोटी रुपये खर्चून रस्त्यांची कामे होणार आहेत. डीपीडीसीच्या निधीतून साडेचार कोटींचे रस्ते शहरात होणार आहेत. तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या सुभोभीकरणासाठी 50 लाख रुपये तर छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी दीड कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे.



 

यावेळी माजी खा.रेंगे म्हणाले की, जांब येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतन इमारतीचे लोकार्पण, बाभळगाव ते मांडाखळी रस्त्याचे भुमिपूजन तसेच निजामकालीन शाळेची इमारत पाडून बांधण्यात येणार्‍या जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचे भुमिपूजन सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी माजी खासदार अ‍ॅड.तुकाराम रेंगे पाटील, माजी आमदार सुरेश देशमुख, उपमहापौंर भगवान वाघमारे, सभापती गुलमीर खान, रवि सोनकांबळे आदी उपस्थित होते. 








Post a Comment

0 Comments