Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

नूतन शिक्षण संस्थेच्या पाषाणहृदयी संस्थाचालकांना 12 दिवसांचा उपोषणाने ही पाजर फुटेना




नुतन शिक्षण संस्थेच्या बोगस पदभरती विरोधात सामाजिक  कार्यकर्तेचा उपोषणाचा बारावा दिवस 

  सेलू   ➡️ शहरातील नामांकित नुतन शिक्षण संस्थेच्या बोगस पद भरती विरोधात श्रीनिवास उघडे यांनी नुतन विद्यालया समोर सुरू केलेल्या उपोषणाला आज 12 दिवस पूर्ण झाले तरी अजूनही पाषाणहृदयी नूतन शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना पाझर फुटेना शाळा प्रशासन व संस्था चालक व्यक्तींनी कोणतीही परिपूर्ण माहिती देण्यासंमंधी कार्यवाही न केल्याने उपोषण करत्याची प्रकुर्ती दिवसेंदिवस ढासळत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.





नूतन विद्यालय व नूतन कन्याप्रशाळेत पद भरतीत झालेल्या अनियमितता बाबत त्वरित चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सुजाण नागरिक, भ्रष्टाचार  विरोधी जनजागृती व निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्रीनिवास उघडे यांनी 03 फेब्रुवारी रोजी  निवेदनाद्वारे संबंधितांकडे केली होती व आठ दिवसात याबाबत चौकशी न केल्यास नूतन विद्यालयासमोरील श्रीरामजी भांगडीया यांच्या पुतळ्यासमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल असा इशारा दिला होता. 




सुजान नागरिक अन्याय व भ्रष्टाचार विरोधी जनजागृती निर्मूलन समितीतर्फे देण्यात आलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे की या संस्थेतर्फे नवीन घेण्यात येणारी पदभरती ही शासनाने नेमून दिलेल्या पवित्र पोर्टलनुसार न घेता केली जात आहे पद नियुक्ती ही संस्थाचालकाच्या मनमानी कारभारानी केली जात आहे. तसेच अंजली ज्ञानेश्वर देशपांडे व बालाजी देऊळगावकर या दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती हि कोणत्या जीआर नुसार करण्यात आलेली आहे.




तसेच वर्ग पाचवी ते बारावी या वर्गाची रोस्टर एकच असल्यामुळे दिनांक 22.06.2016 रोजीची स्थीती मंजूर पदे 130  भरलेली पदे 109 व रिक्त पदे 21 त्यामधील खुले 11 व आरक्षित 10 पदे अशी एकूण 21 रिक्त पदे होती व दिनांक 22.06. 2016 रोजी नंतर निवृत्त झालेले कर्मचारी विचारात घेतले असता रिक्त पदांची संख्या ही वाढलेली असणार.




तसेच दिनांक 03.05.2017 रोजी कनिष्ठ नूतन महाविद्यालय शिक्षण कर्मचारी मंजूर पदे 24 भरलेली पदे 18 व रिक्तपदे 6, तसेच 03.05.2017 नंतर  काही शिक्षक कर्मचारी निवृत्त झाले तर एक शिक्षक कर्मचारी मयत झाला असल्यामुळे रिक्त पदांची संख्या वाढली.  परंतु श्रीनिवास उघडे यांनी विचारलेल्या माहितीच्या अधिकाराखाली अशी माहिती सांगितली कि कनिष्ठ नूतन महाविद्यालयाने दिनांक07.07.2017 रोजी ही माहितीतील मंजुरी पदे 24 भरलेली पदे 24 व रिक्त पदे 0 आहेत, परंतु दिनांक 1.1. 2021 रोजी मंजूर पदे 24 भरलेली पदे 23 व रिक्त पदे एक या सर्व जागा ही पवित्र पोर्टलद्वारे कसे भरण्यात आले?   आणि आरक्षित पदाला न्याय कशाप्रकारे देण्यात आला.




परंतु याबाबत संबधितांनी या अर्जाचा विचार न करता दुर्लक्ष केल्यामुळे श्रीनिवास उघडे यांनी 14 फेब्रुवारी पासून नूतन विद्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. आज उपोषणाला 12 वा दिवस झाले असुन देखील निगरगट्ट व गेंड्याची कातडी पांघरलेल्या संबंधितांनी कार्यवाही  केली नाही.   




12 दिवस झाल्याने हा शहरात चर्चेचा विषय बनला असून उपोषण कर्त्याची प्रकुर्ती दिवसेंदिवस ढासळत आहे .या उपोषणाला पाठिबा वाढत असून याबाबत सखोल चौकशी व्हावी अशी मागणी देखील जोर धरीत आहे.







Post a Comment

0 Comments