Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

शाळेसाठी कोरोना नियमावलीचे काटेकोर पालन करा प्रहार जनशक्ती पक्षाकडून जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार




परभणी ➡️ शाळेसाठीची कोरोना नियमावलीचे काटेकोर पालन करा अन्यथा प्राथमिक व  माध्यमिक शाळा तात्काळ बंद करा, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाने जिल्हाधिकारी यांच्याकडे आज 30 डिसेंबर रोजी निवेदनाद्वारे केली आहे. 


निवेदनात म्हटले आहे की, काल परभणी शहरातील एका खाजगी शाळेमध्ये कोरोना पॉझिटिव्ह विद्यार्थी सापडला यामुळे विद्यार्थी व पालक वर्गामध्ये कमालीची दशहत पसरली आहे . या अगोदरही ग्रामीण भागात काही शाळकरी विद्यार्थी कोरोना पॉझिटिक सापडले आहेत . शहरामध्ये कोविड तपासणीची व्यवस्था आहे परंतू ग्रामीण भागामध्ये या प्रकारची सुविधा उपलब्ध नाही. त्याशिवाय जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने जिल्हयातील शाळांना घालून दिलेले कोरोनाचे निर्बंध व नियमावली जिल्हयातील खाजगी व शासकीय शाळांमध्ये राबवल्याच जात नाही. अनेक शाळांमध्ये अजूनही विद्यार्थ्यांना मास्क वापरणे सक्तीचे केलेले नाही शिवाय कोठल्याही प्रकारचे सॅनेटायझर फवारनी केली जात नाही शिवाय शाळेत सॅनेटायझर दिले जात.



जिल्ह्यातील जवळपास सर्वच शाळा कोरोना नियमावलीचे पालन न करता सुरु असुन वर्गामध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी अक्षरशः कोंबले जात आहेत. या शाळा भविष्यामध्ये कोरोना संक्रमणाचे केंद्र ठरू शकतात व त्याचा स्फोट होऊ शकतो. कोरोना नियमावलीचे पालन न करणे ही अतिशय गंभीर बाब आहे. शालेय विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचे लसीकरण झालेले नाही असे असतानाही अशा विद्यार्थ्यांना एकत्र आणने कोवीड संक्रमणाला निमंत्रण ठरु शकते



निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, तालुका प्रमुख बालासाहेब तरवटे, मीडिया प्रभारी नकुल होगे, सर्कल प्रमुख श्याम भोंग, वैभव संघई इत्यादींच्या सह्या आहेत. 






Post a Comment

0 Comments