Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

शालाबाह्य मुलींच्या शिक्षणासाठी विशेष मोहीम राबवा -  सीईओ शिवानंद टाकसाळे




परभणी ➡️ जिल्ह्यातील सर्वसामान्य, अनाथ, शेतमजूर आणि ऊसतोड कामगारांच्या शालाबाह्य मुलींच्या शिक्षणासाठी विशेष मोहीम राबविण्याच्या कडक सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. (vnsnews-24, feature, parbhani ) 





दि. 30 डिसेंबर 2021 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील मुख्याध्यापिका, लेखापाल, गृहपाल तसेच जिल्ह्यातील गट शिक्षणाधिकारी यांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिक्षणाधिकारी त्र्यंबक पोले, लेखाधिकारी विष्णु कारले, संवाद तज्ञ ज्ञानेश्वर गायकवाड यांच्यासह आदींची उपस्थिती होती.




या आढावा बैठकीत उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना तिखट शब्दात सूचना देताना शिवानंद टाकसाळे म्हणाले की, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील मुलींची उपस्थिती वाढविण्यासाठी प्रत्येकाने विशेष मोहिमेद्वारे गृहभेटीच्या माध्यमातून पालकांशी संवाद साधून पालक व विद्यार्थिनींचे समुपदेशन करावे, मुलींच्या शिक्षणातील गळतीला थांबवावे तसेच ग्रामीण भागातील मुलींचे बालविवाहाचे प्रमाण कमी व्हावे यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, बाहेरगावी गेलेल्या पालकांना संपर्क साधून मुलींच्या शिक्षणाविषयी जागृत करण्या बाबत व सदर कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर योग्य ती कार्यवाही करण्या बाबत यावेळी टाकसाळे यांनी सूचित केले.



तसेच बालिका विद्यालयातील मुख्याध्यापिका यांनी प्रत्येक कर्मचाऱ्यांना किमान दहा मुलींची जबाबदारी सोपवून सदर मुलींच्या संपर्कात राहणे, त्यांचे शिक्षण पूर्ण करणे, त्यांची पोषणाची जबाबदारी घेणे आणि वेळोवेळी पालकांचे समुपदेशन करणे, 26 जानेवारी रोजी शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटपाचे करण्याचे नियोजन करणे आदी कामा बाबत सूचना देण्यात आल्या आहेत.



दैनंदिन जीवन जगतांना सर्वसामान्य मजुराला काय हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात या विषयीची कैफियत टाकसाळे यांनी उपस्थितांसमोर मांडली. मुलींच्या शिक्षणासाठी साखर कारखानदार, वीटभट्टी मालक व इतर संस्थांशी होणार पत्रव्यवहार, गोरगरीब शेतमजुर आणि ऊसतोड कामगार आपल्या मुलांसह ज्या साखर कारखान्यावर, वीटभट्टीवर किंवा इतर ठिकाणी कामासाठी गेले आहेत अशा आस्थापनांना संबंधित विद्यालयाच्या मुख्याध्यापिका पत्र लिहून मुलींच्या होत असलेल्या शैक्षणिक नुकसानीला वाचा फोडणार आहेत.



बालिका विद्यालयात मुलींसाठी मासिकपाळी प्रशिक्षण, योगासने, कराटे क्लास, पूरक आहार, भविष्य वेधी शिक्षण, विषय मित्र संकल्पना, अभ्यास गट, विदेशी भाषा शिक्षण, इंग्रजी स्पोकन क्लास, व्यायसाय मार्गदर्शन असे स्तुत्य उपक्रम राबविले जातात. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलींच्या उज्ज्वल भवितव्याचा विचार करणे गरजेचे आहे. 





Launch a special campaign for the education of out-of-school girls - CEO Shivanand Taksale

 PARBHANI  ➡️ Chief Executive Officer (CEO) Shivanand Takasale has given strict instructions to the concerned officers and employees to implement a special campaign for the education of out-of-school girls of ordinary, orphaned, agricultural laborers and sugarcane workers in the district.



A review meeting of Kasturba Gandhi Balika Vidyalaya headmistress, accountant, housekeeper and group education officer of the district was held on 30th December 2021 in the Zilla Parishad hall under the chairmanship of Chief Executive Officer Shivanand Takasale. Education Officer Trimbak Pole, Accounts Officer Vishnu Karle Etc. were present.



Instructing the officers and staff present at the review meeting, Shivanand Takasale said that in order to increase the attendance of girls in Kasturba Gandhi Balika Vidyalaya, everyone should interact with parents through special visits through home visits and counsel parents and students. "Everyone should take the initiative to contact the expatriate parents and raise awareness about the education of the girls and take appropriate action against the negligent employees," he said. (vnsnews-24, feature, parbhani ) 



Also, the headmistress of Balika Vidyalaya has instructed each staff to keep in touch with the girls, complete their education, take responsibility for their nutrition and counsel the parents from time to time, plan to distribute free uniforms to the students on 26th January. .


Takasale made a statement to the audience about the condition of ordinary laborers in their daily life. Correspondence will be held with sugar mills, brick kiln owners and other organizations for the education of girls.


The girls school conducts commendable activities for girls such as menstrual training, yoga, karate classes, supplementary feeding, future education, subject friendly concepts, study groups, foreign language teaching, English spoken classes, vocational guidance. Therefore, parents need to think about the bright future of their daughters. (vnsnews-24, feature, parbhani ) 






Post a Comment

0 Comments