Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

स्थानिक गुन्हे शाखाने दरोडा टाकण्यासाठी जाणारी टोळी केली जेरबंद, तीन आरोपी अटक




परभणी ➡️ स्थानिक गुन्हे शाखाने 29 डिसेंबर रोजी रात्रीची गस्त करीत असताना एका वाहनातून दरोडा टाकण्यासाठी जाणारी एका टोळी कारवाई करत जेरबंद केली आहे. या कारवाईत तीन आरोपींना पकडण्यात यश आले. पण दोन आरोपी हे फरार झाले आहे. 



परभणी जिल्ह्यामध्ये वाढत असलेल्या चो-यांना प्रतीबंध करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेस प्रभावी रात्रगस्त करण्याचे आदेश झाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दोन शासकीय वाहनाने परभणी शहरात पेट्रोलींग करीत असतांना दिनांक 29 डिसेंबर रोजी पहाटे 03 वाजताच्या सुमारास बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, काही इसम साखला प्लॉट येथुन पांढ-या रंगाच्या पिकअप मध्ये दरोडा टाकण्याचे उद्देशाने व प्राणघातक हत्यारे घेऊन लोहगाव रोडने निघण्याचे तयारीत आहेत. 



अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने स्था.गु.शा. पथक पंचासह परभणी ते लोहगाव रोडवर असलेल्या पॉवर हाऊसचे बाजुस सापळालावुन थांबले असता.  अंदाजे सकाळी 3.40 वाजेच्या सुमारास साखला प्लाट कडुन येणारे एका वाहनास हात दाखवून थांबवून वाहनाची पाहणी करीत असतांना पिकअप वाहनामध्ये पाढीमागे 04 इसम बसलेले दिसले व आम्हास पाहुन पिकमधुन उडया मारुन पळुन जात असतांना त्यांतील दोन इसमास स्था.गुशा पथकाने पाठलाग करुन शिताफीने पकडले व दोन  इसम अंधाराचा फायदा घेऊन पिंगळगड नाल्याकडे पळुन गेले. 



या आरोपीची चौकशी केली असता आरोपीचे नाव करणसिंग गगनसिंग टाक (23 वर्ष रा. साखला प्लॉट, लोहगाव रोड परभणी), राजासिंग हिरासिंग टाक (19 वर्ष जिल्हा परीषद समोर साठे नगर परभणी) 3 .किरण ऊर्फ धनंजय मोतीराम भोजने (वय 35 वर्ष रा. कृषी नगर)  अशी आहे. तर वाहनातून पळुन गेलेल्या इसमांची नाव किसनसिंग धारासिंग दुधांनी आणि कृपालसिंग गुरुबच्चनसिंग दुधानी दोन्ही रा. साखला प्लॉट नवीन वसाहत परभणी असे आहेत. पंचासमक्ष वरील इसमांचे ताब्यात असलेल्या पिकअप वाहनाची झडती घेतली असता. त्याचे ताब्यातील वाहनात दरोडा घालण्यासाठीची अवजारे तसेच प्राणघातक हत्यारे मिळुन आली आहेत. वरील आरोपींनी परभणीत अनेक घरफोडी व चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. 



त्यांच्या विरोधात गंगाखेड, पाथरी, गंगाखेड, ताडकलस, बोरी, मानवत, आंबाजोगाई  या ठिकाणी विविध भा.दं.वि अंतर्गत गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपींनी घरफोडी तसेच चोरी करुन मुददेमाल वाहतुक करणेकरीता अंबाजोगाई येथुन एक बोलेरो पिक अप चोरी केल्याचे तपासात निष्पण झाले आहे. आतापावेतो केलेल्या चौकशीतुन आरोपीकडुन एकुण 78 क्विटल सोयाबीन तसेच दोन बोलेरो पिक अप,रोख 65000/- रु अनेक दरोडा करण्याची प्राणघातक हत्यारे, बोरची 01 एचपी टेराफ्लो कंपनीची मोटार व पाईप असा एकुण 11 लाख 71 हजार  630 रु चा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.


Local crime branch arrests gang, arrests five accused

PARBHANI ➡️  A gang of robbers was arrested on December 29 by the local crime branch while they were on night patrol. Five accused were nabbed in the operation. But the two accused have absconded.


The local crime branch team was patrolling the city of Parbhani in two government vehicles on December 29 at around 3 am when it was informed that some white ISMs from the plot had been spotted. They are preparing to leave Lohgaon Road with the intention of robbing and carrying deadly weapons in a color pickup.


After receiving such convincing news, The team would have stopped at the side of the power house on Parbhani to Lohgaon road with a pancha. At around 3.40 am, while inspecting a vehicle coming from Sakhla Plot, he saw 04 ISMs sitting in the back of the pickup vehicle. They took him and fled to Pingalgad Nala.


The accused were identified as Karan Singh Gagansingh Tak (23 years, resident of Sakhla Plot, Lohgaon Road, Parbhani), Rajasingh Hirasingh Tak (19 years, in front of Zilla Parishad, Sathe Nagar, Parbhani). City) is like that. The names of the fugitives are Kisan Singh Dharasingh Dudhani and Kripal Singh Gurubachansingh Dudhani. Chain plots are like new colony Parbhani. The pick-up vehicle in the possession of Isma would have been seized in front of the panchayat. His vehicle was found to be carrying a robbery weapon as well as a deadly weapon. The accused confessed to committing several burglary and theft cases in Parbhani.


Crimes have been registered against him in Gangakhed, Pathri, Gangakhed, Tadkalas, Bori, Manavat, Ambajogai under various IPCs. The investigation has concluded that the accused had stolen a bolero pick-up from Ambajogai for burglary and theft. A total of 78 quintals of soybeans as well as two bolero pick-ups, cash of Rs 65,000 and several deadly weapons of robbery, a car and pipe of Borchi 01 HP Terraflow Company worth Rs 11 lakh 71 thousand 630 were seized from the accused.





Post a Comment

0 Comments