Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

भडाचीवाडीजवळ कंटेनरवर कार धडकल्याने एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू 




लातूर ➡️ उस्मानाबाद येथून लातूरकडे निघालेल्या लातुरातील पाडे कुटुंबावर काळाने घात घाला घातला असून, समोरुन येणाऱ्या कंटेनरवर कार धडकल्याने झालेल्या भीषण अपघात एकाच कुटुंबातील आई, पती-पत्नी व मुलगा ठार झाले. हा अपघात उस्मानाबाद-धुळे महामार्गापासून जवळच असलेल्या भडाचीवाडीजवळ शुक्रवारी सकाळ 09 वाजण्याच्या सुमारास घडला.









लातूर येथील प्रकाशनगर येथे राहणारे पाडे कुटुंबीय काही कामानिमित्त कारने (एम.एच- 24 -ए.ए. 8055) बाहेरगावी गेले होते. दरम्यान, काम आटोपल्यानंतर ते लातूरच्या दिशेने निघाले असताना शुक्रवार, 31 डिसेंबर रोजी सकाळी 09 वाजण्याच्या सुमारास भडाचीवाडी येथे समोरून येणाऱ्या कंटेनरवर नियंत्रण सुटल्याने पाडे यांची कार कंटेनरखाली घुसली. हा अपघात एवढा भीषण होता की, कारचा चेंदामेंदा झाला आहे.






या अपघातात कारमधील  हिरकणाबाई मुरलीधर पाडे ( वय 70), उमेश मुरलीधर पाडे ( वय 50), सविता उमेश पाडे (वय 45) आणि प्रतिक उमेश पाडे (वय 23) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच उस्मानाबाद ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश साबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश शिंदे, पोहेका. एस.एस. कट्टे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने आणि क्रेनच्या सहाय्याने मृतांना बाहेर काढून येडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये शवविच्छेदनासाठी दाखल केले. या अपघाताची नोंद उस्मानाबाद ग्रामीण पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.







Post a Comment

0 Comments