Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

प्रहार जनशक्तीने आंदोलनाचा इशारा देताच, रखडलेल्या कामाची पाहणी केली कार्यकारी अभियंताने 






परभणी ➡️ निम्न दुधना प्रकल्पा अंतर्गत उजव्या कालव्या वरील मायनर व छोट्या चाऱ्यांच्या गाळ काढणे, दुरुस्ती करणे या संदर्भात प्रहार जनशक्ती पक्षाकडे परिसरातील शेतकऱ्यांनी केली होती. त्यानंतर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने कार्यकारी अभियंता, विभाग क्रमांक 10 परभणी यांना लेखी निवेदन देऊन तत्काळ वरील कामे मार्गी लावावी अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने कार्यालयास टाळा ठोकण्याचा इशारा दिला होता. या तक्रारीची तत्काळ दाखल घेऊन माजलगाव कालवा विभाग क्रमांक 10 चे कार्यकारी अभियंत प्रसाद लांब व प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी आज संबंधित कामाची पाहणी केली. 



निम्न दुधना प्रकल्पा अंतर्गत येणाऱ्या झरी, दमाई वाडी, मिर्झापूर, साडेगाव, बोबडे टाकळी, सावंगी खुर्द, संबर, मटकराळा व मांगनगाव शिवारातून जाणाऱ्या उजव्या कालव्या वरील मायनर व छोट्या चाऱ्यांच्या गाळ काढणे, दुरुस्ती करणे व नियोजित चाऱ्याचे रखडलेली कामे पूर्ण होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होत नाहीत अशी या परिसरातील शेतकऱ्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाकडे लेखी मागणी केली होती.


आज या तक्रारीची तत्काळ दाखल घेऊन माजलगाव कालवा विभाग क्रमांक 10 चे कार्यकारी अभियंत प्रसाद लांब व प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी संबंधित कामाची पाहणी केली.  त्यानंतर  शेतकऱ्यांशी संवाद साधला व कालव्याची व मायनर ची दुरुस्ती, गाळ काढणे व मुख्य कालव्यावर सावंगी खुर्द, मांगनगाव व मटकराळा या ठिकाणी चार पुलाच्या कामाला तत्काळ सुरुवात करून कालव्या बाजूचे रस्ते तयार केले जातील असे आश्वासन देऊन काम येत्या 04 दिवसात सुरू करण्याचे आश्वासन या वेळी शेतकऱ्यांना दिले.






प्रहार जनशक्ती पक्षाच्या पुढाकाराने या परिसरातील कालव्याची व मायनर ची रखडलेले कामे मार्गी लावून शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याशिवाय कालव्यावर पुल झाल्यास शेतकऱ्यांची दळणवळणाची अडचण दूर होणार आहे. याचा फायदा परिसरातील शेतकऱ्यांना मिळून सिंचनाचे क्षेत्र वाढणार आहे.



या वेळी माजलगाव कालवा विभाग क्रमांक 10 चे कार्यकारी अभियंता प्रसाद लांब, सहाय्यक अभियंता वर्ग 1 अंजू काळे, कनिष्ठ अभियंता प्रशांत गायकवाड, प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, दिव्यांग आघाडी तालुका प्रमुख ज्ञानेश्वर पंढरकर, उपतालुका प्रमुख ज्ञानेश्वर पूंजारे, मिडिया प्रभारी नकुल होगे, दत्तराव रवंदळे व परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.






Post a Comment

0 Comments