Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

देवानंद मेश्राम पाच दिवशीय "सुपर रॅन्डोनिअर्स"चे मानकरी




 


 जिंतूर  ➡️ रॅन्डोनिअर्स सायकल क्लब अंतर्गत प्रथमच 25 ते 29 डिसेंबर दरम्यान पाच दिवशीय ऐतिहासिक सुपर रॅन्डोनिअर्स मालिकेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र वातावरण बदलामुळे सायकलिंगसाठी प्रतिकूल परिस्थिती असतांना ही तब्बल पंधराशे किमीचे अंतर निर्धारित वेळेत पूर्ण करून अमरावती जिल्ह्यातील वरुड येथील सेवानिवृत्त नौदल सैनिक तथा कार्यरत तलाठी देवानंद मेश्राम पाच दिवशीय "सुपर रॅन्डोनिअर्स"चे मानकरी ठरले आहे.



जिंतूर रॅन्डोनिअर्स सायकल क्लब मार्फत मागील दोन वर्षांपासून 200, 300, 400 व 600 किमी ब्रेवेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. मात्र दोन वर्षांच्या इतिहासात 25 ते 29 डिसेंबर दरम्यान प्रथमच क्लबच्या वतीने केवळ पाच दिवसात एका पाठोपाठ वरील चारही सुपर रॅन्डोनिअर्स"च्या मालिका आयोजित करण्यात आल्या होत्या. यासाठी वर्धा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. अतुल तायडे आणि अमरावती जिल्ह्यातील वरुड येथील सेवानिवृत्त नौदल सैनिक तथा कार्यरत तलाठी देवानंद मेश्राम यांनी चार ही मालिकेसाठी नाव नोंदणी केली होती.



सुरुवातीच्या 600 आणि 200 किमीच्या मालिका दोघांनी निर्धारित वेळेत पूर्ण केल्या. पण शेवटच्या दोन मालिकांमध्ये वातावरण बद्दल्यामुळे 400 किमीच्या सायकलिंगमध्ये गारपीट झाल्याने डॉ तायडे यांनी ती स्पर्धा पूर्ण केली नाही पण देवानंद मेश्राम यांनी प्रतिकूल परिस्थितीत ही हार न मानता चारही मालिका निर्धारित वेळेत पूर्ण करून केवळ पाच दिवसात सुपर रॅन्डोनिअर्स"चे मान मिळवून मराठवाड्यासह विदर्भात नवीन इतिहास रचला आहे. 



त्यांच्या अद्वितीय यशा बद्दल त्यांना व्यंकटेश भुरे, देवेंद्र भुरे, ज्ञानबा मापारी, प्रमोद भालेराव, शेख शाहरुख, संजय, दराडे, सतीश पलमटे, शेख अलीम, यासीन खान, नजीर पठाण, अजित गोरे, पवन कालापाड, गणेश कुरे, पिंटू माहुरकर, शहेजाद खान आदींच्या वतीने सन्मानित करण्यात आले आहे.







Post a Comment

0 Comments