Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

शिक्षक कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढा उभारला- आ.विक्रम काळे




 परभणी  ➡️ राज्य शासनाकडे पाठपुरावा करून वैद्यकीय बिलाच्या प्रतिपूर्तिमध्ये कोरोना सारख्या आजाराचा समावेश करून घेतला. वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणातील अडथळे दूर करून प्रशिक्षण ऑनलाइन घ्यावे आणि त्याचे सर्टिफिकेट  मोबाईलवर उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला.  प्रचलित धोरणानुसार शाळांना अनुदान देण्यात यावे अशी मागणी सातत्याने करत असून शिक्षक कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढा उभारला असल्याचे प्रतिपादन आ.विक्रम काळे यांनी केले. मराठवाडा शिक्षक आ. विक्रम काळे यांनी नृसिंह माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयास दि. 31 डिसेंबर रोजी भेट दिली.



त्यांचा शाल, श्रीफळ आणि नृसिंह प्रतिमा भेट देऊन प्राचार्य पी.बी. शेळके,  डी.एन. जाधव, गोपाळराव मोरे, प्रा.वसंत लोखंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पुढे बोलताना आ.विक्रम काळे म्हणाले की 1 नोव्हे. 2005 पूर्वी अंशतः अनुदानित, अनुदानित शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. यासाठी सातत्याने राज्य शासनाकडे प्रयत्न सुरू आहेत. राज्यातील शाळांना ग्रंथालयासाठी 25 हजार रुपयाची पुस्तके लवकरच उपलब्ध करून देणार असून ही पुस्तके शिक्षक -विद्यार्थ्यांना नक्कीच उपयक्त ठरणार आहेत.



शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी कॅशलेस ट्रीटमेंट योजना लागू करावी अशी मागणी राज्य शासनाकडे केली आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामप्रसाद अवचार यांनी केले. सूत्रसंचालन त्र्यंबक वडसकर यांनी केले. कार्यक्रम  यशस्वितेसाठी एन. एन. पवार, शैलेश ढगे, एस. बी.बुजुर्ग़े, प्रा. संजय गजमल, माणिक कदम, शंकर मुंडे, राम खरबे, राजू दिपके, गणेश धोपटे, बळीराम बानायत, नारायण एलकेवाड, वैजनाथ गिराम, राजकुमार वाघ आदींनी परिश्रम घेतले.






Post a Comment

0 Comments