Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

परभणीत अवैध सावकारी प्रकरणात सहकार विभागाची धाड




 परभणी  ➡️ शहरात नानलपेठ परिसरात अवैध सावकारी प्रकरणात सहकार विभागाने धाड टाकून कागदपत्रे जप्त केली आहेत. नानलपेठ परिसरातील एका कार्यालयात अवैध सावकारी संबंधाने ए.जी. निकम व पी.जी.बाहेकर यांच्या पथकाने धाड टाकुन झडती घेतली. या झडतीमध्ये सापडलेल्या कागदपत्रांची तपासणी करण्याची कार्यवाही शुक्रवारी संध्याकाळपर्यंत सुरू होती.


प्राप्त माहितीनुसार येथील सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था तथा सावकारांचे सहाय्यक निबंधक ता.परभणी या कार्यालयास अर्जदार अब्दुल वसीम अब्दुल रशीद (रा.मोमीनपुरा परभणी) यांनी अवैध सावकारी संदर्भात तक्रार दिली होती. 




या तक्रारीवरून जिल्हाधिकारी आंचल गोयल, पोलीस अधिक्षक जयंत मीना,  विभागीय सहनिबंधक, औरंगाबाद योगीराज सुर्वे व जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली सावकारांचे परभणी तालुका सहाय्यक निबंधक नानासाहेब कदम यांच्या आदेशान्वये 31 डिसेंबर रोजी गैरअर्जदार मोहम्मद अशफाक मोहम्मद अलीशाह यांचे युसुफ कॉलनी येथील रहाते घरी व नानलपेठ परिसरातील त्यांच्या कार्यालयात अवैध सावकारी संबंधाने ए.जी. निकम व पी.जी.बाहेकर यांच्या पथकाने धाड टाकुन झडती घेतली. 



झडतीमध्ये सापडकेल्या कागदपत्रांची तपासणी करण्याची कार्यवाही सावकारांचे सहाय्यक निबंधक कार्यालयामार्फत सुरु आहे. याबाबत गैरअर्जदार यांना त्यांची बाजु मांडण्याची संधी देवून अवैध सावकारी सिध्द झाल्यास महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, 2014 मधील तरतुदीनुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल.



या कारवाईमध्ये शासकीय पंचाच्या उपस्थितीत व पोलीस बंदोबस्तात पथक प्रमुख म्हणून सहकार अधिकारी श्रेणी- 1 श्रीमती ए.जी. निकम व पी.जी.बाहेकर यांनी तर पथक सदस्य म्हणुन एस.पी. बाशवेणी, सहकार अधिकारी श्रेणी-2, एस.एम.कनसटवाड, सहकार अधिकारी श्रेणी-2, ए. के.कदम, सहाय्यक सहकार अधिकारी,  बी. टी. लिंगायत, सहाय्यक सहकार अधिकारी, ए.यु. राठोड, कनिष्ठ लिपीक, जी. एम. कदम यांनी कामगिरी पार पाडली.







Post a Comment

0 Comments