Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

ध्वनीची विहीत मर्यादा राखून वर्षभरात 15 दिवसाच्या सुटबाबतचे आदेश जारी 





 परभणी  ➡️ जिल्ह्यातील आगामी उत्सवाचा कालावधी लक्षात घेता वर्ष 2022 मध्ये 2 दिवस राखीव ठेवुन उर्वरित 13 दिवसांसाठी पुढीलप्रमाणे फक्त ध्वनीची विहीत मर्यादा राखून सकाळी 6 वाजेपासून रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरण्यास सुट जाहीर करण्यात आली आहे. असे आदेश जिल्हाधिकारी  आंचल गोयल यांनी जारी केले आहेत. 



शिवजयंती,  ईद-ए-मिलाद ,  डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती , 1 मे महाराष्ट्र दिन यांना प्रत्येकी एक दिवस तर  गणपती उत्सव 4 दिवस ( दुसरा दिवस पाचवा दिवस, गौरीविसर्जन व अनंत चर्तुदशी),  नवरात्री उत्सव  2 दिवस (अष्टमी व नवमी),  दिवाळी लक्ष्मीपूजन एक दिवस,   31 डिसेंबर एक दिवस,  ख्रिसमस एक दिवस आणि  उर्वरित 2 दिवस  राज्य शासनाच्या मान्यतेने महत्वाच्या कार्यक्रमासाठी आवश्यकतेनुसार परवानगी दिली जाणार आहे. तसेच  या आदेशाची अंमलबजावणी परभणी  जिल्ह्याच्या हद्दीपुरती मर्यादित राहील. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे. 





Post a Comment

0 Comments