Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

परभणी शहर महानगर पालिकेच्या वतीने विशेष सर्व साधारण सभास





परभणी ➡️ शहर महानगर पालिकेच्या वतीने विशेष सर्व साधारण सभा दि. 01/01/2022 रोजी सकाळी 11.00 वा. महानगरपालिकेच्या बी. रघुनाथ सभागृहामध्ये मा. महापौर पीठासण अधिकारी सौ. अनिता रविंद्र सोनकांबळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. उपमहापौर भगवान वाघमारे, आयुक्त देविदास पवार, अतिरीक्त आयुक्त रणजीत पाटील, नगर सचिव विकास रत्नपारखे यांचे उपस्थित बैठक संपन्न झाली. 



यावेळी सभागृहात विषय क्र. 1 : परभणी शहर महानगरपालिका मल:निस्सरण योजनेतील मल:शुध्दीकरण केंद्रासाठी खाजगी जागा खरेदी करणे बाबत 

याविषयावर सभागृहात अतिरीक्त आयुक्त रणजीत पाटील यांनी मल:निस्सरण योजने अंतर्गत अमलबजावणी करण्यासाठी प्रकल्प सल्लागार यांच्या सविस्तर अहवालानुसार डीपीआर तयार करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधीकरण यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने सदर सल्लागांरामार्फत परभणी शहराचे भैगोलीक सर्वेक्षण करुन मल:निस्सरण योजनेचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे. या आराखडया मध्ये जमीनीचा उतारा मुख्यत्वे दोन दिशेने म्हणजेच उत्तर-पूर्व व दक्षिण-पूर्व दिशेने वांगी गावाला जाणा-या रस्त्यालगत खाजगी जागा सर्वे क्र. 245 मधील 1 हेक्टर 61 आर (04 एकर) जागा महानगरपालिकेमार्फत खरेदी करण्यात आली असुन, महानगरपालिकेच्या ताब्यात आहे. दुसरी जागा दक्षिण-पश्चिम दिशेने पिंगळगड नाल्या जवळील परिसरात अपेक्षीत असल्याने व त्या दिशेने बहुतांश जमिनीचा भाग हा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विदयापीठ, परभणीच्या अखत्यारीत जागा आहे. त्यामुळे कार्यालयीन पत्र जा.क्र.कावि/मनपा/श.अ./बांध/अमृत/158/2019 दि. 11/12/2019 अन्वये सदर मल:शुध्दीकरण केंद्राकरीता 10 एकर जागा उलबध्दतेसाठी पत्र देण्यात आले होते. 



सदर प्रस्तावास वसंतराव नाईक मराठवाडा कृषी ‍विदयापीठ, परभणी मार्फत अदयाप जागा उपलब्ध झाली नाही व त्याबद्दल सदर विभागामार्फत कोणत्याही प्रकारची सकारात्मक कार्यवाही सुरु असल्याचे दिसुन येत नाही. परभणी शहरासाठी मल:निस्सारण योजनेची आवश्यकता पहाता सदर प्रकल्पासाठी शासकीय जागा उपलब्ध होत नसल्याने, परभणी शहर  मल:शुध्दीकरण केंद्रासाठी रायपुर गावाच्या शिवारातील पिंगळगड नाला लगत परिसरातील खाजगी जमीन  तांत्रीक दृष्टया योग्य आहे किंवा कसे या बाबत महानगरपालिका अभियंता व प्रकल्प सल्लागार तथा महाराष्ट्र जीवन प्राधीकरण यांचे तज्ञ अधीका-यासोबत स्थळ पाहाणी करण्यात आली. 



त्याअनुषंगाने प्रकल्प सल्लागार तथा महाराष्ट्र जीवन प्राधीकरण यांचे पत्र जा.क्र./माजीप्राविप/तांश/2057/2021 दि. 17/12/2021 रोजीच्या पत्रात नमुद केल्यान्वये वर नमुद स्थळ पाहणीतील खाजगी जागा तांत्रीक दृष्टया योग्य असल्याचे नमुद आहे. त्या अनुषंगाने सदर जागे लगत तांत्रीक दृष्टया योग्य असलेल्या रायपुर गावाजवळ, रायपुर शिवरातील पिंगळगड नाला परीसरालगत सर्वे क्र. 136/129, 128, 136, 138 व 130 येथील 10 एकर खाजगी जमीन खरेदी करण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने प्रती एकर प्रमाणे दर पत्रक मागविणे योग्य याविषयावर शहर अभियंता वसीम पठाण यांनी सभागृहात माहीती दीली. तसेय याविषयावर नगर सेवक सचिन देशमुख यांनी सभागृहात छोटया नाल्यावर सुध्दा कारेगांव रोड नालीच्या जागेवर 7/12 ची पाहणी करावी लागेल, या विषयावर उपमहापौर भगवान वाघमारे लोकेशन नुसार कारेगांव रोड येथे छोटया नाल्यावर 7/12 बघुन घेण्यात येईल असे सांगण्यात आले. याविषयावर एकमताने सभागृहनेते सयद समी ऊर्फ माजुलाला यांनी सुचविले त्यास अनुमोदन नगरसेवक अतुल सरोदे यांनी दिले.



विषय क्र. 2 : परभणी शहर महानगरपालिका व परभणी जिल्हा कबड्डी असोसीएशेन यांच्या संयुक्ती विदयामाने 68 वी वरिष्ठ महीला गट राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा अयोजनास मान्यता मिळणे बाबत 


याविषयावर सभागृहात अतिरीक्त आयुक्त रणजीत पाटील यांनी माहिती दिली. महाराष्ट्र राज्यक्रिडा संस्कृतिचा मोठा वारसा असुन क्रिडा धोरण राबविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. या विविध स्पर्धेमधुन राज्यातील उत्कृष्ट खेळाडुंची निवड राष्ट्रीय स्पर्धेकरीता होत असते. याचाच वारसा म्हणुन परभणी शहर महानगरपालिका व परभणी जिल्हा कबड्डी असोसीएशेन यांच्या संयुक्ती विदयामाने 69 वी वरिष्ठ महीला गट राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा दि. 15/01/2022 ते 19/01/2022 या कालावधीत जिल्हा क्रिडा संकुलन येथे महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसीएशेन मान्यतेचे पत्र प्राप्त झाले आहे. शहराचा व महानगरपालिकेचा शिरपेचात हा मानाचा तुरा असणार आहे. त्यामुळे परभणी जिल्हात्यातील क्रिडा क्षेत्राला चालना मिळणार आहे. परभणी जिल्हयातील 184 मुले व 68 मुली राष्ट्रीय पातळीवर खेळतांना महाराष्ट्राला पदरमिळुन  दिले आहे. तसेच जिल्हयाने मागील 20 वर्षामध्ये अनेक वेळा राज्य स्पर्धेमध्ये विजेते व उपविजेते पद  मिळविले आहे. 




शहराला 68 वी वरिष्ठ महीला गट राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा अयोजनाची संधी उपलब्ध झाली आहे. या स्पर्धेचे आयोजन भव्यदिव्य होईल व पाहुने खेळाडुंचे आदारातिथ्य चांगल्या प्रकारे व्हावे याकरीता महानगरपालिकेला य स्पर्धेकरता आर्थिक भार उचलावाला लागणारे आहे, याकरीता सभागृहाने एकमताने मंजुरी दीली. याविषयावर सभागृहात विरोधी पक्षनेते विजयसिंह जामकर यांनी आपल्या शहरामध्ये  68 वी वरिष्ठ महीला गट राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा आयोजनाचा मान मिळला आहे, या स्पर्धेसाठी एकमताने सभागृहाने मंजुरी देण्यात यावी, या ठरावास सभागृहनेते सयद समी ऊर्फ माजुलाला, नगरसेवक अतुल सरोदे, सचिन आंबिलवादे, सौ.मंगला मुदगलकर, गटनेते चंद्रकांत शिंदे, प्रशंसा ठाकुर यांच्यासह सभागृहाने एकमताने मंजुरी दिली.




विषय क्र. 3 : महापौर निधी 2021-2022 अंतर्गत कामास मान्यता मिळणे बाबत. 

याविषयावर सभागृहामध्ये महापौर निधी 2021-2022 अंतर्गत शहरातील सिटी पॅलेस हॉटेल ते गांधी पार्क पर्यंत बीटी रोड करणे या कामास सभागृहाने एकमताने मंजुरी देण्यात आली.



विषय क्र. 4 : समांतर पाणी पुरवठा योजना राबविण्याकरीता प्रस्तावास सुधारीत मान्यता देणे बाबत. 

याविषयावर सभागृहात 106 कोटी खर्चास मान्यता मिळणे शहरातील समांतर पाणी पुरवठा योजना हाती घेण्यासाठीचा प्रस्ताव, सविस्तर प्रकल्प अहवाल मुख्य अभींयता महाराष्ट्र जीवन प्राधीकरण, औरगांबाद यांचे मार्फत अधीक्षक अभीयंता महाराष्ट्र जीवन प्राधीकरण, मध्यवर्ती नियोजन व सनियत्रंण यांचे कडे सादर करणे करीता ठराव एकमताने मंजुर करण्यात आला.


विषय क्र. 5 : परभणी शहर महानगरपालिकेचे मुस्लीम समाजासाठी अल्पसंख्याक निधीमधुन शादीखाना / मंगल कार्यालय तयार करणे या बाबत मान्यता मिळणे बाबत. 

या विषयावर सभागृहात सभागृहनेते सयद समी ऊर्फ माजुलाला, अब्दुल मेहराज अब्दुल मजीद यांनी सभागृहात गरीब मुस्लीम समजासाठी अल्पसंख्याक निधीमधुन शादीखाना / मंगल कार्यालय तयार करण्यात यावे, जेणे करुन त्यांना मदत होईल. याबाबत एकमताने सभागृहाने मंजुरी दयावी अशी सुचना केली याविषयावर विजय जामकर, अतुल सरोदे यांनी हाज हाउस, वारकरी ‍निवासस्थान, विपश्यना केंद्र, जैन मंदीरासाठी व इतर सर्व जाती धर्मासाठी देण्यात यावी, या करीता सभागृहाने एकमताने मंजुरी देण्यात आली.



विषय क्र. 6 : विविध योजना केंद  व राज्य शासनाकडुन आलेल्या निधीस मान्यता देणे बाबत.

या विषयावरविरोधी पक्षनेते विजय जामकर यांनी खासदार / आमदार यांचा निधी व शासनाकडुन आलेला निधी व ठोक निधी मंजुरी देण्यात यावी, यास अनुमोदन प्रंशास ठाकुर, श्रीमती. जयश्रीताई खोबे, सुशील कांबळे व नाजमीन पठाण यांनी एकमताने मंजुरी दिली. यावर महापौर सौ.अनिताताई रविंद्र सोनकांबळे व उपमहापौर भगवान वाघमारे यांनी शहराच्या विकासाठी केंद्र व राज्य शासन ठोक निधी, खासदार / आमदार यांचा निधी या सर्व कामांना एकमताने मंजुरी देण्यात येते, असे सभागृहात सांगितले. परभणी शहर महानगरपालिकेच्या हद्दीतील शहराच्या स्वच्छतेविषयी प्रभाग क्र. 15 अंतर्गत  स्वच्छतेच्या कामासाठी स्वच्छता कामगार उपलब्ध होत नाहीत कमी प्रमाणात आहेत, तसेच काही स्वच्छता कामगार काम चुकार आहेत, यांच्यावर कारवाई करण्यात यावी, याविषयावर सभागृहात स्थायी समिती सभापती गुलमीर खान यांनी जेसीबी कोठे आहेत आम्हाला मिळत नाहीत, ज्यांना जेसीगी देण्यात आले आहेत त्त्यांच्याकडुन तात्काळ मागवुन घेवुन त्यांना नोटीस दया व शहरात ज्याठिकाणी आवश्यक आहेत त्या ठीकाणी जेसीबी पुरवठा करण्यात यावा, या बाबत यांत्रीकी विभाग प्रमुख यांनी कंत्राटदाराला 03 महीन्यापुर्वीच नोटीस काढण्यात आली असुन सदर जेसीबी लवकरच हस्तगत करण्यात येतील असे सांगीतले. या बाबत उपमहापौर भगवान वाघमारे यांनी शहरात ज्याठिकाणी आवश्यक आहेत त्या ठीकाणी जेसीबी पुरवठा करण्यात येईल, असे सुचविले आहे. तसेच मा.आयुक्त यांनी 04 दिवसांत जेसीबी परत मागवुन घ्या असे सभागृहात सांगीतले.



.




Post a Comment

0 Comments