Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

श्री खंडोबा माळेगाव यात्रेनिमित्त पोलीस अंमलदारांना अधिकार




नांदेड ➡️ माळेगाव येथील खंडोबा यात्रेतील पालखी मिरवणूक व इतर कार्यक्रम शांततेत पार पडावे. त्यात कसल्याही प्रकारची बाधा येऊ नये व शांतता रहावी म्हणून पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी मुंबई पोलीस कायदा 1951 कलम 36 अन्वये प्राप्त अधिकारान्वये 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून ते 6 जानेवारी 2022 च्या मध्यरात्री पर्यंत कंधारचे उपविभागीय पोलीस अधिकारी मारोती थोरात व माळाकोळीचे सहा. पोलीस निरीक्षक माणिक डोके यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 36 मधील पोट कलम अ ते फ प्रमाणे पुढील अधिकार प्रदान केले आहेत.



श्री खंडोबा यात्रेत महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक, इतर राज्यातून भाविकांची दर्शनासाठी व यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्याअनुषंगाने रस्त्यावरील व रस्त्याने जाणाऱ्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकांनी कशा रितीने चालावे व कोणत्या रितीने वागावे हे फर्मविण्यासाठी. अशा कोणत्याही मिरवणुका कोणत्या मार्गाने आणि कोणत्या वेळात काढाव्यात किंवा काढू नयेत असे मार्ग अशा वेळा विहित करण्याबद्दल. 



सर्व मिरवणुकीच्या व जमावाच्या प्रसंगी व पुजा-अर्चेच्या प्रार्थना स्थळाच्या सर्व जागेच्या आसपास पुजा-अर्चेच्या वेळी कोणताही रस्ता किंवा सार्वजनिक जागा येथे गर्दी होणार असेल किंवा अडथळे होण्याचा संभव असेल अशा सर्व बाबतीत अडथळा होऊ न देण्याबद्दल. सर्व रस्त्यांवर किंवा रस्त्यांमध्ये, घाटांत किंवा घाटांवर, सर्व धक्क्यांवर व धक्क्यांमध्ये आणि सार्वजनिक स्नानाच्या, कपडे धुण्याच्या व उतरण्याच्या जागांच्या ठिकाणी व जागांमध्ये, जत्रा, देवालये आणि सार्वजनिक स्थळी किंवा लोकांच्या जाण्या-येण्याच्या जागेमध्ये सुव्यवस्था राखण्याबाद्दल. 



तसेच सार्वजनिक ठिकाणी अथवा सार्वजनिक करमणुकीच्या ठिकाणी ध्वनीक्षेपकांच्या आवाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी व सुचना देण्यासंबंधी. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33, 35 ते 40, 42, 43, 45 या अन्वये दिलेल्या कोणत्याही आदेशास अधीन असलेले व त्यास पुष्टी देणारे सुव्यवस्था राखणेकामी योग्य आदेश देण्याबाबत.


कोणीही इसमांनी हा आदेश लागू असे पर्यंत नांदेड जिल्ह्यातील कंधार येथील उपविभागीय पोलीस अधिकारी मारोती थोरात व माळाकोळीचे सहा. पोलीस निरीक्षक माणिक डोके यांचेकडून रहदारीचे नियम व मार्गाबाबत सुचना कार्यक्रमाची तारीख, वेळ, जाहीरसभा, मोर्चे, मिरवणूक, निदर्शने, पदयात्रा इत्यादी कार्यक्रम संबंधीत पोलीस फौजदार किंवा वरिष्ठ अधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करावे. 



परवानगी दिलेल्या जाहिर सभा/मिरवणूका/पदयात्रा यात समयोजित घोषणा सोडून किंवा ज्या घोषणांनी शांतता व सुव्यवस्थेला बाधा होऊ शकते अशा घोषणा देऊ नये. हा आदेश लग्नाच्या ठिकाणी, प्रेत यात्रेस लागू नाही. या आदेशाचे उल्लंघन केल्यास मुंबई कायदा कलम 134 प्रमाणे अपराधास पात्र ठरेल, असे आदेशही पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी जारी केले आहेत.





Empowerment of Police Officers on the occasion of Shri Khandoba Malegaon Yatra


NANDED ➡️ Palkhi procession and other events of Khandoba Yatra at Nanded-Malegaon should be carried out peacefully. In order to maintain peace and tranquility, Superintendent of Police (SP) Pramod Shewale, under Section 36 of the Mumbai Police Act, 1951, directed that from midnight on December 31 to midnight on January 6, 2022, Kandahar Sub-Divisional Police Officer Maroti Thorat and Malakoli. Inspector Manik Doke has been given the following powers under sub-sections A to F of section 36 of the Maharashtra Police Act, 1951.




Shri Khandoba Yatra attracts a large number of devotees from Maharashtra, Telangana, Andhra Pradesh, Karnataka and other states. Accordingly, to formulate the manner in which the people on the road and in the procession or crowd on the road should walk and behave. About the manner in which any such procession should be taken out and the time in which it should or should not be taken out.




On the occasion of all processions and gatherings and around the place of worship of the puja-arche, during the puja-arche, no road or public place will be crowded or obstructed in all cases where there is a possibility of obstruction. To maintain order in all roads and streets, in ghats or ghats, in all jerks and jerks, and in public baths, laundry and landing places and places, fairs, temples and public places or public places.




Also to control and give instructions on the sound of loudspeakers in public places or places of public entertainment. Subject to any order given under Sections 33, 35 to 40, 42, 43, 45 of the Maharashtra Police Act, 1951 and to give proper order for maintaining order.



Until the ISM enforces the order, Maroti Thorat, a sub-divisional police officer from Kandhar in Nanded district and six others from Malakoli. The instructions given by Police Inspector Manik Doke regarding traffic rules and routes, the date, time, public meeting, marches, processions, demonstrations, marches, etc.




Permitted public meetings / processions / marches should not include announcements or announcements that may disturb peace and order. This order does not apply to the funeral procession, at the place of marriage. Violation of this order is punishable under section 134 of the Mumbai Act, said Superintendent of Police Pramod Shewale.







Post a Comment

0 Comments