Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

आखाड्यावर चोरट्यांचा धुमाकूळ काट्या कुर्‍हाडीने मारहाण करत 50 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास  




पालम (आरूणा शर्मा) ➡️ नाव्हा शिवारातील एका शेतातील आखाड्यावर अज्ञात चार चोरट्यांनी आखाड्यावर धुमाकूळ घालून  आखाड्यावर झोपलेल्या व्यक्तींना लाट्या काट्या व कुर्‍हाडीने मारहाण करून 49 हजार 900 रुपयाचा मुद्देमाल लंपास केला असल्याची घटना पालम तालुक्यातील नाव्हा शिवारात 30 डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास घडली. या संदर्भात अज्ञात चार चोरट्याविरुद्ध पालम पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 


नाव्हा शिवारातील शेतातील आखाड्यावर 30 डिसेंबर रोजी पहाटे चोरट्यांनी धुमाकूळ घालून अंबादास राव भीमराव ठावरे हे आपल्या कुटुंब्यासह आखाड्यावर झोपले होते अज्ञात चार चोरट्यांनी लाट्या काट्या व कुर्‍हाडीने अंबादास ठावरे यांना जबर मारहाण करून  त्यांच्या पत्नी व नाती जवळील 50 तोळे चांदीचे दागिने दोन ग्राम सोन्याचे दागिने एक मोबाईल असा 49 हजार 900 रुपयाचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.



या घटनेत जखमी अंबादास ठावरे यांना उपचारासाठी परभणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुष्पा ठावरे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चार चोरट्याविरुद्ध पालम पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल बाहात्तरे हे करत आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक जयंत मिना उप विभागीय पोलीस अधिकारी जावडे पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे यांनी घटनास्थळी भेट दिली असून श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते. याप्रकरणी दोन संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे समजते.






Post a Comment

0 Comments