Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

गुटखा विक्री प्रकरणी चोहोट्टा बाजार येथील किराणा व्यापाऱ्यास अटक




अकोला ➡️ जिल्ह्यातील चोहोट्टाबाजार ता. अकोट येथे प्रतिबंधित अन्नपदार्थांची (गुटखा, पानमसाला,सुगंधी तंबाखू, सुगंधी सुपारी. खर्रा) विक्री करणाऱ्या किराणा व्यापाऱ्यावर बुधवारी (दि.29 )  कारवाई करुन अटक करण्यात आली. या व्यापाऱ्या विरुद्ध  दहिहांडा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती  सहाय्यक आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन सा. द. तेरकर यांनी दिली आहे.



यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की, मे. शाहिद किराणा, मेन रोड, चोहट्टा बाजार, ता. अकोट, जि. अकोला येथे बुधवारी अन्न व औषध प्रशासन, अकोला कार्यालयाचे अन्न सुरक्षा अधिकारी नितीन नवलकार यांनी धाड टाकली. या दुकानात प्रतिबंधित अन्न पदार्थांची विक्री होत होती असेच प्रतिबंधीत अन्न पदार्थ जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या साठ्याची किंमत 8 हजार 790 रुपये इतकी आहे. 



याप्रकरणी दुकानाचा मालक शेख शहीद शेख इसहाक यास ताब्यात घेण्यात आले. त्याचे विरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायदा कलम 26(02),(i),26 (02)(iv) तसेच भादंवि कलम 328,188, 272, 273 नुसार दहिहांडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 



ही कारवाई अन्न व औषध प्रशासन, अकोला कार्यालयाचे सहायक आयुक्त सागर तेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी नितीन नवलकार यांनी केली असून कार्यवाहीत कार्यालयाचे नमुना सहायक बी. एच. नरवणे हे सहभागी होते.




Grocery trader arrested at Chohotta Bazaar in gutka sale case


 AKOLA  ➡️ Chohottabazar in the district tal. A grocery trader was arrested on Wednesday (29) in Akot for selling prohibited food items (Gutkha, Panamsala, Scented Tobacco, Scented Arecanut. Kharra). A case has been registered against the trader at Dahihanda police station, according to the Assistant Commissioner (Food), Food and Drug Administration. The. Terkar has given.


The detailed news in this regard was that, M / s. Shahid Kirana, Main Road, Chohatta Bazar, Tal. Akot, Dist. The raid was carried out by Nitin Navalkar, Food Safety Officer, Food and Drug Administration, Akola office in Akola on Wednesday. Prohibited food items were confiscated as they were being sold in the shop. The confiscated stock is valued at Rs 8,790.


The shop owner Sheikh Shaheed Sheikh Ishaq was arrested in the case. A case has been registered against him under sections 26 (02), (i), 26 (02) (iv) of the Food Safety and Standards Act and sections 328, 188, 272 and 273 of the Bhadanvi.


The action was taken by Food Safety Officer Nitin Navalkar under the guidance of Assistant Commissioner Sagar Terkar of Food and Drug Administration, Akola office. H. Narvane was involved.





Post a Comment

0 Comments