Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

जिंतूरात आडत व्यापाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या




जिंतूर ➡️ शहरातील आडत 56 वर्षीय व्यापाऱ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि.29) सायंकाळी 06 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. या संदर्भात जिंतूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आले आहे। 



पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार आत्महत्या केलेल्या व्यापाऱ्याचे नाव आशिष सावजी कळमकर ( वय 56 वर्ष ) असे आहे. जिंतूर शहरापासून जवळच असलेल्या नेमगिरी व चंद्रगिरीच्या मध्यभागी एका लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आशिष कळमकर यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती जिंतूर पोलिसांना देण्यात आली.  



29 डिसेंबर रोजी बुधवारी सायंकाळी त्यांनी आपल्या व्यवसायातील भागीदाराच्या मोबाईलवर मी चंद्रगिरीच्या परिसरात आत्महत्या करीत असल्याचा संदेश पाठविला. हा संदेश पाहुन भागिदार आणि नातेवाईकांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली.  पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला. आशिष कळमकर यांच्या आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या आत्महत्येमुळे शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, मुलगी असा परिवार आहे.



Suicide by hanging of a trader in Jintura


Jintur ➡️ A 56-year-old Adat trader committed suicide by hanging himself in the city on Wednesday (29) at around 06 pm. The incident has caused a stir in the city. A case of accidental death has been registered at Jintur police station in this regard.



According to police sources, the deceased was identified as Ashish Savji Kalamkar (56). Ashish Kalmakar's body was found hanging from a lemon tree in the middle of Nemgiri and Chandragiri near Jintur city. The incident was reported to Jintur police.



On Wednesday evening, December 29, he sent a message on his business partner's mobile that I was committing suicide in Chandragiri area. Seeing this message, the partners and relatives started searching for him. The police took the body into custody and sent it to a rural hospital for autopsy.


The exact reason behind Ashish Kalmakar's suicide is not yet clear. His suicide has caused a stir in the city. He is survived by his wife, a son and a daughter.







Post a Comment

0 Comments