Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

औरंगाबाद येथे बनावट चलनी नोटा जप्त , पाच आरोपी अटक





औरंगाबाद ➡️ बनावट नोटा तयार करून त्या चलनात आणणाऱ्या पाच जणांच्या टोळीला औरंगाबाद पोलिसांनी आज अटक केली. शहरात एका दारूच्या दुकानात काही इसम बनावट नोटा देऊन दारू खरेदी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. 



याआधारे विशेष पोलीस पथकाने सापळा रचून ही कारवाई केली. या टोळीकडून 01 लाख 20 हजार रुपये दर्शनी मूल्याच्या 500, 100 आणि 50 रुपयांच्या बनावट चलनी नोटा जप्त करण्यात आल्या. नोटा तयार करण्यासाठी वापरात येणारं साहित्य, वाहतुकीसाठी वापरलेली कार आणि 05 मोबाईल असा एकूण 03 लाख 10 हजार 390 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.



या टोळीची पाळेमुळे राज्यभर पसरली असल्याची शक्यता पोलिस सूत्रांनी वर्तविली. समरान ऊर्फ लक्की रशीद शेख (30, रा.जसवंतपुरा, नेहरूनगर), नितीन कल्याणराव चौधरी (25, रा. मुकुंदवाडी गाव), अक्षय अण्णासाहेब पडूळ (28, रा. गजानननगर), दादाराव पोपटराव गावंडे (रा. 42, गल्ली क्र-1 गजानननगर), रघुनाथ चैनदास ढवळपुरे (49, रा. गजानननगर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने आरोपींना 03 जानेवारी 2022 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.




Five accused arrested in Aurangabad


AURANGABAD ➡️ Aurangabad police today arrested a gang of five persons for making counterfeit notes and bringing them into circulation. Police had received information that some ISMs were buying liquor in a liquor shop in the city by giving fake notes.



Based on this, a special police squad set a trap and took this action. Counterfeit currency notes of Rs 500, Rs 100 and Rs 50 with face value of Rs 01 lakh 20 thousand were seized from the gang. Materials used for making notes, cars used for transportation and 05 mobiles worth Rs. 03 lakh 10 thousand 390 have been seized.



Police sources said that the gang may have spread across the state. amran alias Lucky Rashid Sheikh (30, resident of Jaswantpura, Nehru Nagar), Nitin Kalyanrao Chaudhary (25, resident of Mukundwadi village), Akshay Annasaheb Padul (28, resident of Gajanannagar), Dadarao Poptrao Gawande (resident of 42, street no-1) Gajananagar), Raghunath Chaindas Dhawalpure (49, resident of Gajananagar). While the accused were produced in the court, the court remanded the accused to police custody till 03 January 2022.






Post a Comment

0 Comments