Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

परभणी शहरातील विवेक नगरात 1 लाखाची चोरी





परभणी ➡️ वसमत रस्त्यावरील विवेक नगरात बुधवारी (दि.29) पहाटे  नागनाथ गणपतराव कुलकर्णी यांच्या घरात 1 लाखाची चोरी झाली. याबाबत पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. 



पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार शहरातील विवेक नगरात नागनाथ कुलकर्णी कुटुंबीय कामांनिमित्त औरंगाबादला गेले असता चोरट्यांनी समोरील दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. 



कपाटात ठेवलेल्या सोन्याच्या तीन अंगठ्या व 15 हजाराची  रोख रक्कम चोरीला गेल्याचे कुलकर्णी कुटुंबीयांनी सांगितले. पोलिस उपनिरीक्षक दिगांबर जामोदकर, फिंगरप्रिंट विभागाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पठाण, पोलिस कॉन्स्टेबल अनिल कोगुंलवार, जमादार बबन शिंदे यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली व चोरट्यांचा शोध घेतला. याप्रकरणी नागनाथ कुलकर्णी यांच्या फिर्यादीवरून नवा पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




1 lakh theft in Vivek Nagar, Parbhani


PARBHANI - 1 lakh was stolen from the house of Nagnath Ganapatrao Kulkarni on Wednesday (29) morning in Vivek Nagar on Wasmat road. A complaint has been lodged with the police in this regard.




According to police, while Nagnath Kulkarni was on his way to Aurangabad for family work in Vivek Nagar, the thieves broke the lock of the front door and entered.




According to the Kulkarni family, three gold rings and Rs 15,000 in cash were stolen from the cupboard. Sub-Inspector of Police Digambar Jamodkar, Assistant Inspector of Police of Fingerprint Department Pathan, Police Constable Anil Kogunlwar, Jamadar Baban Shinde went to the spot and searched for the thieves. A case has been registered against an unidentified accused at the Nawa police station on the complaint of Nagnath Kulkarni.






Post a Comment

0 Comments