Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

फसवणूक टाळण्यासाठी आर्थिक साक्षरता गरजेची - कंपनी सचिव परेश देशपांडे 




परभणी ➡️ ऑनलाईन आर्थिक व्यवहार आपल्या दैनदिन जगण्यातला अविभाज्य घटक बनला आहे. ऑनलाईन पध्द्तीने होणाऱ्या आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी आर्थिक साक्षरता महत्वाची असल्याचे मत भारतीय कंपनी सचिव संस्थानचे नोडल अधिकारी परेश देशपांडे यांनी व्यक्त केले. श्री शिवाजी महाविद्यालयात बुधवार (दि.29) रोजी आजादी का अमृत महोत्सव निमित्ताने आयोजित आर्थिक साक्षरता कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. 



यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव, प्रमुख उपस्थितीत दिनेश लोहाडे, गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.रोहिदास नितोंडे, प्रबंधक विजय मोरे, महोत्सव समन्वयक डॉ.जयंत बोबडे, सदस्य डॉ.एम.एस. परतुरकर, प्रा.डी.जी.गवळी आदींची उपस्थिती होती. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना देशपांडे पुढे म्हणाले, परभणी जिल्ह्यातील विद्यार्थीमध्ये प्रचंड क्षमता आहेत, ह्या क्षमता ओळखून घेत आपल्यात मृदू कौशल्य विकसित करून ध्येय निश्चित केले पाहिजे असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी कंपनी सचिव कोर्स तसेच  वाणिज्य क्षेत्रात उपलब्ध संधीविषयी विस्ताराने मार्गदर्शन केले. 



कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव म्हणाले, आज आपण भारतीय कंपनी सचिव संस्थान दिल्ली यांच्याशी करार करत आहोत. यामुळे परभणीतील विद्यार्थ्यांना कंपनी सचिव होण्यासाठी लागणारे मार्गदर्शन, परीक्षा आदींची सोय उपलब्ध होणार आहे. या संधीचा फायदा विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रम समाप्तीनंतर भारतीय कंपनी सचिव संस्थान आणि श्री शिवाजी महाविद्यालयात परीक्षा, अभ्यासक्रम, अध्यापन याविषयी द्विपक्षीय करार झाला.



सदरील कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ.जयंत बोबडे यांनी आजादी का अमृत महोत्सवाची भूमिका विशद करत महाविद्यालयाच्या हीरक महोत्सवाची माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.डॉ.रहमान शेख तर आभार प्रा.डी. जी.गवळी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.गणेश चालींदरवार, डॉ.दिगंबर रोडे,  डॉ.रुपेश देशमुख, डॉ.प्रवीण धापसे, प्रा.शेख, प्रा.गोपाळ परांडे, एकनाथ देवकर, सय्यद सादिक, दत्तराव वाघमारे आदींनी पुढाकार घेतला.



Financial literacy is needed to prevent fraud - Company Secretary Paresh Deshpande


PARBHANI ➡️ Online financial transactions have become an integral part of our daily lives. Paresh Deshpande, Nodal Officer, Institute of Company Secretaries, India, said that financial literacy is important to prevent online financial fraud. He was speaking while guiding a financial literacy workshop organized on the occasion of Independence Ka Amrut Mahotsav on Wednesday (29) at Shri Shivaji College.




Principal Dr. Balasaheb Jadhav, Chairman of the program, Dinesh Lohade, Coordinator of Quality Assurance Cell Dr. Rohidas Nitonde, Manager Vijay More, Festival Coordinator Dr. Jayant Bobade, Member Dr.M.S. Parturkar, Prof. DG Gawli etc. were present. While guiding the students, Deshpande further said that the students of Parbhani district have tremendous potential and by recognizing these potentials we should develop soft skills and set goals. During this time he gave detailed guidance on Company Secretary Course as well as opportunities available in Commerce.




While concluding the program, Principal Dr. Balasaheb Jadhav said, "Today we are signing an agreement with Indian Institute of Company Secretaries, Delhi. This will provide guidance, examination etc. to the students of Parbhani for becoming a company secretary. He appealed to the students to take advantage of this opportunity. After the conclusion of the program, a bilateral agreement was reached between the Institute of Company Secretaries of India and Shri Shivaji College regarding examinations, courses and teaching.




In the introduction of the program, Dr. Jayant Bobade explained the role of Azadi Ka Amrut Mahotsav and informed about the Diamond Festival of the college. The program was moderated by Prof. Dr. Rahman Sheikh and thanked by Prof.Dr. By G. Gawli. Dr. Ganesh Chalindarwar, Dr. Digambar Rode, Dr. Rupesh Deshmukh, Dr. Praveen Dhapse, Prof. Sheikh, Prof. Gopal Parande, Eknath Deokar, Syed Sadiq, Duttrao Waghmare and others took initiative for the success of the program.






Post a Comment

0 Comments