Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

गंगाखेड नगर परिषदेच्या कार्यालय अधिक्षकास लाच घेताना रंगेहात अटक





परभणी
➡️ गंगाखेड नगर परिषदेच्या कार्यालय अधिक्षकास आज बुधवार दिनांक 30 डिसेंबर रोजी दुपारी लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. एका नागरिकाच्या प्लॉटची नोंद मालमत्ता रजिस्टरला करण्यासाठी लाचेची मागणी करुन नगर परिषद कार्यालय  गंगाखेड येथे 1 हजार 500 रुपये स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली.

या प्रकरणात 40 वर्षीय व्यक्तीने लेखी तक्रार दिली होती. त्यावरुन सापळा रचून आरोपी सुरेश सत्यनारायण मणियार (वय 46 वर्षे, कार्यालय अधीक्षक, नगरपरिषद, गंगाखेड) यास ताब्यात घेण्यात आले. त्याने 1500  रुपये लाचेची मागणी केली होती. लगेच त्याची पडताळणी करुन सापळा रचण्यात आला. आरोपीस लाचेच्या रक्कमेसह ताब्यात घेण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नांदेड परिक्षेत्राच्या पोलिस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर, अपर पोलिस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली परभणीचे पोलिस उपअधिक्षक भरत हुंबे यांच्या पथकाने ही कारवाई केली.




Post a Comment

0 Comments