Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

65 वा क्षेत्रीय रेल्वे सप्ताह साजरा- विडीयो कॉन्फेरेन्सिंग द्वारे पुरस्कार वितरण





नांदेड ➡️ वर्षा पूर्वी, दिनांक 16 एप्रिल 1853 ला भारतात पहिल्यांदाच मुंबई ते ठाणे दरम्यान रेल्वे धावली होती. त्या क्षणाच्या स्मरणात भारतीय रेल्वे दर वर्षी रेल्वे सप्ताह साजरा करत असते. यात रेल्वे सेवेत वर्षभर उत्कृष्ठ कार्य करण्याऱ्या रेल्वे अधिकारी आणि कर्मचारी यांना पुरस्कार देवून गौरवण्यात येते. कोविड-19 च्या प्रभावामुळे या वर्षीचा रेल्वे साप्ताह चा कार्यक्रम एप्रिल महिन्यात साजरा होऊ शकला नाही. 

दक्षिण मध्य रेल्वे क्षेत्रीय कार्यालयात 65 वा रेल्वे साप्ताह पुरस्कार सोहळा (जी.एम. अवार्ड) आज दिनांक 30 डिसेंबर, 2020 रोजी साजरा करण्यात आला. कोविड-19 च्या प्रभावामुळे या वर्षी विडीयो कॉन्फेरेन्सिंग द्वारे पुरस्कार वितरण करण्यात आले.  यात मुख्य कार्यक्रम सिकंदराबाद येथे साजरा झाला, हैदराबाद, सिकंदराबाद, गुंटकळ, विजयवाडा, गुंटूर सह नांदेड रेल्वे विभागातील रेल्वे अधिकारी आणि कर्मचारी यांना त्यांच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांच्या हस्ते महाव्यवस्थापक पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

नांदेड रेल्वे विभागात श्री उपिंदर सिंघ, विभागीय रेल्वे व्यवस्थापक,  नांदेड विभाग यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. नांदेड विभागात 15 व्यक्तिगत तर 02 सांघिक पुरस्कार देवून कर्मचाऱ्यांचा गौरव  करण्यात आला. नांदेड विभागाने दक्षिण मध्य रेल्वे मध्ये क्षेत्रीय स्तरावर उल्लेखनीय कार्य केले आहे. या वर्षी नांदेड रेल्वे विभागाला 03 शिल्ड (ढाल)  मिळाल्या आहेत. ज्यात उत्कृष्ठ रेल्वे पटरी (बेस्ट ट्रेक), उत्कृष्ठ सुरक्षा (सेफ्टी) आणि नवकल्पना (इनोवेशंस) या तीन शिल्ड शामिल आहेत.  याकरिता श्री उपिंदर सिंघ यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे. 

या प्रसंगी श्री नागभूषण राव, अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेड  यांच्यासह इतर विभागीय रेल्वे अधिकारी  आणि कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री गजानन माल्या, महाव्यवस्थापक, दक्षिण मध्य रेल्वे यांनी आपल्या उद्घाटन पूर्ण भाषणात वर्ष 2019-20   दरम्यान दक्षिण मध्य रेल्वे ने केलेल्या कार्याची माहिती दिली आणि सर्व रेल्वे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबाला शुभेच्छा दिल्या. रेल्वे प्रवाश्यांच्या सुरक्षेसाठी निरंतर कार्य करण्याकरिता सदैव तत्पर राहण्याचे आवाहन केले. सुरक्षित, सुखद प्रवास हे नेहेमी आपले प्राधान्य राहिले पाहिजे असे आवाहन त्यांनी उपस्थित रेल्वे कर्मचाऱ्यांना केले.





Post a Comment

0 Comments