Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

कर्तव्यावर गैरहजर असलेल्या पोलिस कर्मचारी निलंबित





परभणी ➡️ धनादेशाव्दारे 90 हजार रुपये घेऊनही प्लॉट घेऊन न देता तसेच रक्कम परत न फसवणूक करणार्‍या, तसेच चार महिन्यांपासून कर्तव्यावर गैरहजर असलेल्या एका पोलिस कर्मचार्‍यास जिल्हा पोलिस अधीक्षक जयंत मीना यांनी बुधवारी (दि.30) निलंबित केले.

परभणीतील दत्तनगरमध्ये प्लॉट घेऊन देतो, असे दीड वर्षापूर्वी पोलिस शिपाई विनायक भोपळे यांनी परजिल्ह्यातील एका व्यक्तीस म्हटले होते. तसेच त्या व्यक्तीकडून दोन जून 2019 रोजी 90 रुपयांचा धनादेश घेतला. तो धनादेश स्वतःच्या बँकेच्या खात्यावरून वठवून घेतला. 90 हजार रुपये प्लॉट घेऊन देतो म्हणून भोपळे यांनी घेतले. मात्र, दीड वर्षाचा कालावधी होऊनही त्यांनी संबंधितास दत्तनगरमध्ये प्लॉट घेऊन दिला नाही. शिवाय, चाल-ढकल करीत रक्कमही परत केली नाही. परिणामी, त्या व्यक्तीस आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आले. शिवाय, पोलिस शिपाई भोपळे हे दि. 17 ऑगस्ट 2020 पासून कर्तव्यावर अनधिकृतपणे गैरहजर असल्याचेही निदर्शनास आले. त्यामुळे जबाबदार, कर्तव्यनिष्ठ पोलिस शिपाई म्हणून कार्यरत असतानाही सर्वसामान्य जनतेची फसवणूक होणार नाही असे अपेक्षित असताना भोपळे यांनी जाणीवपूर्वक फसवणूक करून गुन्हेगारी स्वरूपाचे गैरवर्तन करीत पोलिस दलाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला असल्याचे नमूद करीत जिल्हा पोलिस अधीक्षक जयंत मीना यांनी बुधवारी (दि.3) भोपळे यांना सेवेनतून निलंबित केले.



Post a Comment

0 Comments