Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

नववर्षाच्या स्वागत साधेपणाने करा :- जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर





परभणी ➡️ कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर नूतन वर्षाचे स्वागत अत्यंत साधेपणाने करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी आज केले आहे.

कोरोनाच्या अनुषंगाने गुरुवारी (दि.31) दिवसभर संचारबंदी नसली तरी देखील सरत्या वर्षाला निरोप देण्यासाटी व शुक्रवारी (दि. एक जानेवारी 2021) नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने नागरिकांनी घराबाहेर न पडता नववर्षाचे स्वागत घरीच साधेपणाने करावे, गुरुवारी नागरिकांनी बागेत, रस्त्यावर अशा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने संख्येने येऊन गर्दी न करता सोशल डिस्टंसिंग राहील तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे, जिल्ह्यातील नागरी भागात अऩेक ठिकाणी नागरिकांची गर्दी होत असते. त्या दृष्टीने कोरोनाचा प्रादूर्भाव पाहता नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेणे आवश्यक असल्याचेही जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी म्हटले आहे.

60 वर्षावरील नागरिकांनी व 10 वर्षाखालील मुलांनी सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीने शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे, नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारे धार्मीक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करू नये, मिरवणूका काढू नयेत. नववर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी (एक जानेवारी) नागरिक धार्मीक स्थळी जात असतात. 

सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करता सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे, शक्यतो धार्मीक स्थळी गर्दी करू नये, तसेच संबंधितांनी आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात, फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येऊ नये, ध्वनिप्रदूषणाच्या अनुषंगाने नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असेही आवाहन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी केले आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकय शिक्षण विभाग तसेच महानगर पालिका, पोलिस, स्थानिक प्रशासन यांनी नियमांचे काटेकोर पालन करावे, अशाही सूचना जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी संबंधितांना दिल्या आहेत.




Post a Comment

0 Comments