Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

हृदयरोग असलेल्या गरजू बालकांच्या पालकांनी जिल्हा रुग्णालय येथे संपर्क साधावा





परभणी ➡️ जिल्हा रुग्णालय परभणी अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत 0 ते 18 वयोगटातील बालकांची तपासणी शिबिर दिनांक 29 डिसेंबर रोजी डॉ. प्रफुल पाटील मल्टी स्पेशालीस्ट येथे आयोजित करण्यात आले होते. या  शिबिरामध्ये एकूण 30 बालकांची तपासणी करण्यात असून त्यापैकी 07 बालकांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. 

या शिबिरामध्ये जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील शाळा व अंगणवाडी तपासणी दरम्यान आर.बी.एस के. पथकाद्वारे संशयित ऱ्हदयरोग असणारे बालकांची नोंद केली जाते. त्यानंतर अशा बालकांना आवश्यकते मोफत उपचार व शस्त्रक्रिया केली जाते. यावेळी काही बालकांची अवघड शस्त्रक्रिया असल्याने त्यांना मुंबई येथे बोलवून शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. हे शिबिर डॉक्टर प्रफुल पाटील मल्टी स्पेशलिस्ट रुग्णालय येथे संपन्न झाले असून डॉ.भूषण चव्हाण, डॉ.राहुल डोके ढेरे, धैर्यशील चोले, महेंद्र उरणकर व विक्रम कोल्हेकर तसेच डॉ.विनोद पाटील व टीम यांच्यावतीने घेण्यात आले आहे. ही शस्त्रक्रिया शिबिर यशस्वी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले आहे. 

या शिबिराचे नियोजन जिल्हा कार्यक्रम समन्वयक मीनाक्षी पदमे व सर्व आर.बी. एस के. पथकातील कर्मचारी यांनी केले. या शिबीराद्वारे सर्व जनतेस आव्हान करण्यात येते की, हृदयरोग असलेल्या गरजू बालकांसाठी आर.बी. एस के. विभाग जिल्हा रुग्णालय येथे संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. एस. नागरगोजे यांनी केले आहे.





Post a Comment

0 Comments