Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

सोमवंशी आर्य क्षत्रिय प्रादेशिक संस्थेच्या वतीने सन 2021 दिनदर्शिकेचे अनावरण संपन्न





ठाणे ➡️ सोमवंशी आर्य क्षत्रिय प्रादेशिक संस्थेच्या वतीने सन 2021 करिता तयार करण्यात आलेल्या 'दिनदर्शिकेचे' अनावरण (प्रकाशन) प्रादेशिक संस्थेचे विद्यमान अध्यक्ष ॲड. मोहनराव पिंपळे यांच्या शुभहस्ते सोमवंशी आर्य क्षत्रिय समाज मुरलीधर मंदिर, कल्याण येथे आज करण्यात आले. 

या प्रसंगी प्रादेशिक संस्थेचे उपाध्यक्ष श्री राजेंद्र संगमनेरकर, प्रादेशिक संस्थेचे माजी अध्यक्ष श्री मोहन आहेर, प्रादेशिक संस्थेचे सरचिटणीस ॲड इंद्रजित डोंगरे, प्रादेशिक संस्थेचे संघटन सचिव श्री किशोर कांबळे, प्रादेशिक संस्थेचे सोलापूर येथिल जिल्हा प्रतिनिधी श्री गुरुदत्तप्रभु चव्हाण, प्रादेशिक संस्थेचे सल्लागार श्री मनिष मानेकर, कल्याण समाजाचे कार्याध्यक्ष श्री श्याम चव्हाण, कल्याण समाजाचे विश्वस्त श्री संजय ओतूरकर, पुणे समाजाचे विश्वस्त श्री गिरीश डेंगळे, रणरागिणी महिला समितीच्या अध्यक्षा श्रीमती सुरेखा शिंदे व अनेक मान्यवर उपस्थित होते.

प्रादेशिक संस्थेची दिनदर्शिका तयार करण्याची जबाबदारी सोलापुर येथिल जिल्हा प्रतिनिधी श्री गुरुदत्तप्रभु चव्हाण यांनी अतिशय मेहनत व परिश्रम घेऊन पार पाडली. प्रादेशिक संस्थेच्या वतीने सदर दिनदर्शिका समाजबांधवांना मोफत देण्यात येणार आहे.




Post a Comment

0 Comments